Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक, देशपांडेंचा पोलिसांकडून शोध सुरु

संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक, देशपांडेंचा पोलिसांकडून शोध सुरु

Subscribe

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या गाडी चालकाला अटक करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थ येथून संदीप देशपांडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परंतु देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले आहेत. देशपांडेंच्या चालकाला अटक केली आहे परंतु देशपांडे अद्याप फरार आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना गाडीत बसवल्यानंतर ड्रायव्हरने गाडी दामटवली. यामुळे देशपांडे पोलिसांच्या तावडीतून फरार होण्यास यशस्वी झाले आहेत. पंरतु या सगळ्या धावपळीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे. सरकारी कामात देशपांडेंनी अडथळा आणला आहे. यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. तसेच देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्ते संतोष धुरीसुद्धा फरार झाले आहेत.

मी फरार झालो नाही – देशपांडे

- Advertisement -

संदीप देशपांडे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का दिला हा आरोप खोडून काढला आहे. मी महिला काॅन्स्टेबलला घक्काबुक्की केलेली नाही. महिला पोलिसांना माझा स्पर्शही झाला नाही. तसेच मी कुठेही पळून गेलो नाही. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण संदीप देशपांडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासावे असे सांगून खोटे गुन्हे दाखल केले तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भोंग्यांविरोधातील आंदोलन सुरुच राहणार

राज ठाकरेंनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरत नाहीत तोपर्यंत मनसेचे हनुमान चालिसा आंदोलन सुरुच राहील. राज्यातील मशिदींवर जे अनधिकृत भोंगे आहेत ते हटवण्यात यावेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र मनसैनिकांना हिंदू बांधवांना सांगायचे आहे, हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या ठिकाणी मशिदींवरील भोंगे वाजतील त्याच्या समोर हनुमान चालीसा वाजलीच पाहिजे. तसेच १३५ मशिदींवर मुंबई पोलीस काय कारवाई करणार?, कारवाई करणार की नाही? याबाबत समजेलच असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Load Shedding : ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचा शॉक; 6 तास वीजपुरवठा बंद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -