घरमहाराष्ट्रचोवीस तासात चोरटे गजाआड; वैभववाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

चोवीस तासात चोरटे गजाआड; वैभववाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Subscribe

सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यात पोलिसांनी चोरट्यांना २४ तासांच्या आत पकडले आहे.

वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा बाजारपेठेत सराफी दुकान फोडणाऱ्या चौघा चोरट्यांना वैभववाडी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भुईबावडा बाजारपेठेत शुक्रवारी मध्यरात्री भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी सराफी दुकान फोडून सुमारे ६० हजार रुपये किमंतीची दोन किलो चांदी लंपास केले होते. दरम्यान वैभववाडी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वरवडेकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर पोलीस पथकाने अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली.

हेही वाचा – चोरट्यांना पकडण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची मोहीम

- Advertisement -

असे पकडले पोलिसांनी चोरट्यांना

दरम्यान गस्तीवर असणारे पोलीस हवालदार एस.डी.पाटील, चालक दादासो कांबळे यांनी करूळ चेकपोष्ट ते गगनबावडामार्गे भुईबावडा घाट अशी गस्त घालत असताना भुईबावडा घाटात दोन मोटारसायकल आल्या. एका मोटारसायकलवर तिजोरी होती. तर दुसरी मोटारसायकल त्यांच्या मागोमाग होती. दरम्यान याचवेळी गस्तीला असणारे पोलिस आले. यावेळी तिजोरी घेऊन जाणारी मोटारसायकलने पोलिस व्हँनला हुलकावणी देऊन पुढे गेली. त्या दुचाकीवरील चोरट्यांनी २०० मीटर अंतरावर जावून तिजोरी टाकून दिली. आणि ते दोघे चोरटे तेथेच झाडाझुडुपांत लपून राहिले. त्यांच्या मागावून येणाऱ्या मोटारसायकलवरून दोन चोरट्यांनी पोलिसांना बघताच परत भुईबावडा दिशेने आपली गाडी फिरवली. दरम्यान, ५०० मीटर अंतरावर गेल्यावर त्यांची मोटारसायकल स्लीप झाली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले. त्यांना वैभववाडी पोलिसात आणून अटक केली आहे. तर तिजोरी घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडलेल्या चोरट्यांच्या मोबाईल- वरून फोन करून आम्ही गाडीवरून पडलो आहोत. तुम्ही उंबर्डे येथे या असे सांगण्यात आले. यावेळी ते दोघे चोरटे उंबर्डे येथे आले. यावेळी वैभववाडी पोलिसांनी कोम्बिंग अॉपरेशन करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र याबाबत पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत अधिकृत माहिती वरिष्ठ पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर यांनी दिली.


हेही वाचा – महिला पोलीस शिपायांची कमाल; पाठलाग करून चोरट्यांना पकडले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -