घरमहाराष्ट्रCorona: पुण्यात कोरोनाने घेतला पोलीस अधिकाऱ्याचा बळी; आतापर्यंत राज्यात ४ जणांचा मृत्यू

Corona: पुण्यात कोरोनाने घेतला पोलीस अधिकाऱ्याचा बळी; आतापर्यंत राज्यात ४ जणांचा मृत्यू

Subscribe

धनकवडी येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाहिये. अशा परिस्थितीत पुण्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे सोमवारी एका अधिकाऱ्याने आपला जीव गमावला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पुण्यातील धनकवडी येथील भारती रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाने राज्यात आत्तापर्यंत चार पोलिसांचा बळी घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

- Advertisement -

 


करोनाचा तिसरा पोलीस बळी

आतापर्यंत राज्यात ४ जणांचा मृत्यू

यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर, संदीप सुर्वे आणि कॉन्टेबल शिवाजी सोनावणे यांचा मुंबईत मृत्यू झाला. तर, आज फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ३००हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर, चार पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना ५० लाखांचे कवच मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा देखील केली आहे.

- Advertisement -

५८ वर्षांचे सहायक उपनिरीक्षक फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ते गेल्या १२ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांना उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा देखील त्रास होता. पुणे येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी आपले प्राण गमावले, असे भारती रुग्णालयाचे उप वैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -