घरCORONA UPDATECoronavirus Lockdown: सामुहिक आरती केल्यामुळे विहिंपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

Coronavirus Lockdown: सामुहिक आरती केल्यामुळे विहिंपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

Subscribe

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आला असला तरी अजूनही काही लोक त्याला आव्हान देत आहेत. धोकादायक पद्धतीने एकत्र येऊन अजूनही धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. अहमदनगरमधील अकोले तालुक्यात कोतूळ येथे सामूहिक आरतीचा कार्यक्रम घेतल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री आणि बजरंग दलाचे नेते शंकर गायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासही या आरतीला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही विरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर गायकर यांच्यासहीत प्रदीप भाडे, डॉ. नीलेश कडाळे, मंदिराचे पुजारी विजय वैद्य आणि इतर असे मिळून १३ जणांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व धर्मीयांनी सामूहिक कार्यक्रम, पूजा-अर्चा करु नये, असे आवाहन वारंवार केलेले आहे. तरिही अनेक ठिकाणी सर्वधर्मीयांकडून त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.

- Advertisement -

११ एप्रिल रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी कोतूळ गावातील श्री वरदविनायक गणेश मंदीरात गावकऱ्यांना जमवून सामूहिक आरती घेण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६ कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. लोकांनी एकत्र येऊन समारंभ साजरे केल्यास हा धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस शिपाई गणेश शिंदे यांनी या सामूहिक आरतीची तक्रार नोंदवल्यानंतर या सर्व लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -