घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलीस गौतमीला बघण्यात मग्न; मद्यपींची पत्रकारांना मारहाण

पोलीस गौतमीला बघण्यात मग्न; मद्यपींची पत्रकारांना मारहाण

Subscribe

नाशिक : शहरातील ठक्कर डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मंगळवारी (दि.१६) राडा झाला. गौतमीच्या हुल्लडबाज चाहत्यांनी पत्रकारांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत छायाचित्रकार अशोक गवळी आणि व्हिडीग्राफर आकाश येवले जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, एकेकडी पत्रकारांना मारहाण केली जात असताना पोलीस मात्र गौतमीचे नृत्य बघण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे.

गौतमी पाटील हिचा मंगळवारी (दि.१६) नाशिकमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. हुल्लडबाज चाहत्यांनी कार्यक्रमात राडा घालण्यास सुरूवात केली. यावेळी पत्रकारांनी चाहत्यांची समजूत काढण्यासाठी गेले. त्यावेळी काही तरुणांनी थेट पत्रकारांना मारहाण केली.

- Advertisement -

या मारहाणीत छायाचित्रकार अशोक गवळी आणि व्हिडीग्राफर आकाश येवले जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या राड्यानंतर कार्यक्रमात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीच्या घटनेवेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी थेट स्टेजवर जाऊन चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, संबंधित तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांसह नागरिकांनी केली आहे.

आयोजकांवर कारवाई होणार का?

अशोक गवळी हे छायाचित्र काढत असताना एका मद्यपी टोळक्याने त्यांना स्टेजवरुन खाली ओढले आणि मारहाण केली. बाऊंसर उपस्थित असतांनाही त्यांना जमावाने जुमानले नाही. गौतमीच्या बहुतांश कार्यक्रमात हानामार्‍या होत असताना आयोजकांनी सुरक्षीततेची पुरेशी व्यवस्था का केली नाही असा प्रश्न केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -