घरताज्या घडामोडीवेगाचे वेड! महिन्याभरात वाहतूक खातं झालं 9 लाखांनी 'समृद्ध'

वेगाचे वेड! महिन्याभरात वाहतूक खातं झालं 9 लाखांनी ‘समृद्ध’

Subscribe

मुंबई ते नागपूर प्रवासी अंतर कमी करण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. या महामार्गाचा पहिला पहिला टप्पा म्हणजेच नागपूर-शिर्डी मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. एकिकडे हा महामार्ग प्रवासवेळ कमी करण्यासाठी दिलासादायक असला तरी, दुसरीकडे वाहनांच्या अतिवेगामुळे या महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मुंबई ते नागपूर प्रवासी अंतर कमी करण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर-शिर्डी मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. एकिकडे हा महामार्ग प्रवासवेळ कमी करण्यासाठी दिलासादायक असला तरी, दुसरीकडे वाहनांच्या अतिवेगामुळे या महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि अतिवेगाने धावत असणाऱ्या वाहनांचा स्पिड कमी करण्यासाठी पोलिसांनी स्पीडगनच्या माध्यमातून कारवाईला सुरू केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून वाहतूक विभागाने विदर्भात 650 वाहनांवर कारवाई केली असून त्यातून 9 लाखांचा दंड वसूल केला आहे. (police collect 9 lakh rupees penalty for highspeed of car on nagpur shirdi samruddhi expressway at vidarbha region)

समृद्धी महामार्गाच्या 520 किलोमीटरच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन एक महिना पूर्ण झाला. मात्र, समृद्धी महामार्गाने प्रवासाची वेळ वाचत असली तरी वाहनांच्या अपघातांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली होती. या महामार्गामुळे वाहनधारकांना कमी वेळेत लवकर प्रवास करणे शक्य होत आहे. मात्र, प्रवासादरम्यान वाहनांचा वेग हा प्रति तास 120 हून अधिक असतो. त्यामुळे वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. सुस्साट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी पोलीस खात्यावर देण्यात आली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात राज्य महामार्ग पोलिसांनी स्पीडगनद्वारे 650 वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमधून 9 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत 173 वेगवान वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात 45 वाहनावर कारवाई करण्यात आली.

नो पार्किंगसह महामार्गावर सेल्फी काढणाऱ्या वाहन चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीडगन कार्यान्वित झाले नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अति वेगवान वाहनांवर लगाम घालण्याची धुरा महामार्ग पोलिसांवर सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई पालिकेतील ‘या’ प्रकल्पावरून ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -