Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कुडाळ राडा प्रकरण: आमदार वैभव नाईकांसह सेना- भाजपाच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कुडाळ राडा प्रकरण: आमदार वैभव नाईकांसह सेना- भाजपाच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्गातील कुडाळ पेट्रोल पंपावर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी तुफान राडा झाला. या राड्याप्रकरणी आता आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना- भाजपाच्या ४० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमवत राडा घातल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवसेनेच्या वैभव नाईकांसह २० ते २५ शिवसेनेच्या जणांवर तर  दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम 188,143 अन्वये गुन्हे दाखल असल्याचे समजते.भाजपच्या १० ते १२ जणांवर कुडाळ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे भारत पेट्रोल पंपावर सामान्य जनतेला १०० रुपयात दोन लीटर पेट्रोल आणि भाजपा सदस्य असलेल्यांना १ लिटर उपक्रम सुरु केला. यावरून भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचे रुपांतर काही वेळाने हाणीमारीत झाल्याने कोकणातील राजकीय वातावरण प्रचंड तापले. भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

- Advertisement -

याप्रकरणी आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक ृयांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. अन्यथा भाजप आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल, असा इशारा राजन तेली यांनी दिला. जमावबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे भाजपा आमदार नितेश राणे यांनीही वैभव नाईकांविरोधात तीव्र शब्दात टीका केली आहे. एकंदरीत शिवसेना भवनानंतर कुडाळमध्ये झालेल्या भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांमधील राड्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


दुबईने भारतासह अन्य देशांतून येणाऱ्यांना प्रवास निर्बंधांतून दिली मुभा, पण ‘या’ आहेत अटी

 

- Advertisement -