घरमहाराष्ट्रPolice Constable Recruitment : पोलीस विभागात 17,471 जागा भरणार; बेरोजगारांना मोठी संधी

Police Constable Recruitment : पोलीस विभागात 17,471 जागा भरणार; बेरोजगारांना मोठी संधी

Subscribe

मुंबई : राज्यात आत्तापर्यंत 23 हजार 628 पोलीस शिपयांची पदभरती झाली आहे, अशी माहिती मागील महिन्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलीस शिपाई विभागात भरती केली होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या पोलीस विभागात शिपाई संवर्गातील 17 हजार 471 जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काल बुधवारी (ता. 31 जानेवारी) गृह विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. (Police Constable Recruitment of 17,471 posts, great opportunity for unemployed)

हेही वाचा… Budget & Stock Market : बजेट सादर केले जात असतानाच शेअर बाजारात घसरण!

- Advertisement -

पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत. वित्त विभागाने 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50 टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर, राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने पोलीस शिपाई संवर्गातील 100 टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील ही रिक्त पदे भरतीसाठी राबविण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने तसेच ओएमआर आधारित परीक्षा घेण्याला मान्यता देण्यात आली आहे. या परीक्षेची जबाबदारी पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक व अन्य पोलीस प्राधिकारी यांच्याकडे असणार आहे. तसेच, पोलीस शिपाई भरती प्रक्रियाअंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांना देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -