घरमहाराष्ट्रमराठा आंदोलनादरम्यान पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मराठा आंदोलनादरम्यान पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

मराठा समाजाच्या धर्तीवर कायगाव टोका येथे पोलिस बंदोबस्त करण्यात आले होते. या बंदोबस्त दरम्यान, पोलीस शिपाई श्याम पाडगावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कामाच्या तणावीतून त्यांचे निधन झाल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे.

मराठा आंदोलनाच्या धर्तीवर कायगाव टोका येथे पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. या बंदोबस्तीमध्ये तैनात असलेले पोलिस शिपाई श्याम पाडगावकर यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मराठा समाज ५८ मूकमोर्चे काढल्यानंतर आता आक्रमक झाला आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता झाली नाही म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. सध्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, कामाच्या तणावामुळे श्याम यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

काकासाहेब शिंदेंच्या अंत्यविधीवेळी पोलीस बंदोबस्त

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी आंदोलन करणाऱ्यांपैकी काकासाहेब शिंदे या आंदोलनकर्त्याने सोमवारी गोदावरी नदीमध्ये उडी घेतली. या तरुणावर आज कायगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले. या अंतिम संस्कारावेळी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा कुठलीही दंगल घडू नये, यासाठी पोलीस बंदोस्त करण्यात आला होता. या बंदोबस्तात श्याम पाडगावकर देखील तैनात होते. दरम्यान, दुपारी दोनच्या त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

चंद्रकांत खैरे यांना परतावे लागले

या अंत्यविधीसाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आले होते. खैरेंना मराठा समाजाच्या तरुणांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खैरे यांना तसेच माघारी फिरावे लागले. मराठा आंदोलन आता तीव्र होताना दिसत असून उद्या (बुधवारी) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये बंदीची हाक आंदोलकांकडून देण्यात आली आहे. आज महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. औरंगाबादकडून पुण्याला जाणाऱ्या एसटी बंद करण्यात आल्या आहेत. आतापर्यत आंदोलनामध्ये १७९ एसटी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -