Homeक्राइमComedian Sunil Pal : अखेर बेपत्ता विनोदवीर सुनील पाल यांच्याशी संपर्क; बुधवारी...

Comedian Sunil Pal : अखेर बेपत्ता विनोदवीर सुनील पाल यांच्याशी संपर्क; बुधवारी मुंबईत परतणार

Subscribe

प्रसिद्ध विनोदवीर सुनील पाल गेल्या काही तासांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बेपत्ता सुनील पाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून ते बुधवारी परतणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : प्रसिद्ध विनोदवीर सुनील पाल गेल्या काही तासांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुनील पाल यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अशातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. बेपत्ता सुनील पाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून ते बुधवारी परतणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Police contact missing comedian Sunil Pal who has been missing for four days)

माध्यमांशी बोलताना सुनील पाल यांच्या पत्नीने सांगितले की, सुनील पाल हे अनेकदा त्याच्या शोसाठी मुंबईबाहेर जात असतात. यावेळी ते एका शोसाठी चार दिवसांपूर्वी मुंबईबाहेर गेले होते आणि आज ते परतणार होते, मात्र नियोजित वेळेत परत आले नाहीत. त्यामुळे मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मी चिंतेत पडले आणि अखेर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

हेही वाचा – Molestation : मरोळ मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि सुनील पाल यांच्याशी संपर्क साधला. यावेळी सुनील पाल यांनी पोलिसांनी ते ठीक असल्याचे सांगून उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती दिली. यानंतर पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना सुनील पाल यांच्या पत्नीने सांगितले की, एका पोलीस अधिकाऱ्याशी त्याचं (सुनील पाल) बोलणं झालं असून त्यांनी मेसेज केलाय की ते घरी परतत आहेत. त्यांच्यासोबत जे काही घडलं असेल ते आम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहोत. सध्या आम्ही क्राईम ब्रँचच्या कार्यालयात बसलो आहोत. मुंबई पोलिसांनी त्यांचा फोन नंबर ट्रेस केला असून त्यांच्या हे लक्षात आले आहे की, सुनील पाल हे कुठल्यातरी जाळ्यात फसले होते. या सर्व गोष्टींचा आम्ही उद्या पत्रकार परिषदेत खुलासा करणार आहोत.

सुनील पाल यांची कारकीर्द

दरम्यान, विनोदी जगतात सुनील पाल यांचे वेगळे स्थान आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय शो केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या उत्कृष्ट कॉमिक टाइमिंग आणि मजेदार शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचे नाव ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या शोशी जोडले गेले आहे, जिथे त्यांनी आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवले. याशिवाय सुनील पाल यांनी अभिनयातही हात आजमावला आहे. ‘फिर हेरा फेरी’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘किक’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता आणि त्यांच्या विनोदी अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते.

हेही वाचा – Attack on Women Police : आधी महिला पोलीस पथकाशी हुज्जत मग मारहाण; मद्यपी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल


Edited By Rohit Patil