घरमहाराष्ट्रपोलिसांनी 'सामना'मध्ये दहशत निर्माण केली; संजय राऊतांचा आरोप

पोलिसांनी ‘सामना’मध्ये दहशत निर्माण केली; संजय राऊतांचा आरोप

Subscribe

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. पण आता राऊत यांनी याप्रकरणात थेट पोलिसांवरच आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे याने ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले होते. याप्रकरणी त्यांनी पोलिसांना आणि राज्याचे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पत्र पाठवले होते. यानंतर ठाणे पोलिसांनी एक पथक पाठवून संजय राऊत यांचा नाशिक येथे जाऊन जबाब नोंदवून घेतला. पण आता राऊतांनी थेट पोलिसांवरच आरोप केले आहेत. मी नाशिकला असताना पोलिसांनी ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन दहशत निर्माण केल्याचे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, हे सरकार गुंडांचे आणि खोकेवाल्यांचे सरकार आहे. मी जी तक्रार देखील केली. त्याप्रकरणी तपासणी होण्याऐवजी साक्षीदाराला धमकावणे, त्याच्यावर दबाव आणणे, मी नसताना सामनाच्या कार्यालयात जाऊन तिथल्या लोकांना धमकावणे हे होत राहणार आहे. तर एक गुंड जो मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जातो. त्यांच्या खासदार मुलासोबत देखील तो गुंड दिसतो आणि त्यालाच पोलीस आता संरक्षण देत आहेत, असा आरोप राऊत यांनी पोलिसांवर केला आहे.

- Advertisement -

पुढे बोलताना संजय राऊत यांनी संगितले की, मला यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. तर तुम्ही याची तपासणी करावी. त्यामुळे याबाबत इतके चिडण्याचे काहीही कारण नाही. मी याबाबत जबाब देखील दिला आहे. पण मी नसताना सामनाच्या कार्यालयात जाऊन तिथल्या लोकांना धमकावणे. तुम्ही आम्ही सांगतो तसे बोला नाही तर… अशी धमकी पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी पोलिसांवर केला आहे.

मी नसताना सामनाच्या कार्यालयात जाणे, तिथल्या लोकांना घाबरवणे-धमकावणे, तपासाच्या नावाखाली कार्यालय थाटणं, हवे तसे कागद आधीच प्रिंट करून आणल्याची माहिती राऊतांनी दिली. तसेच मी मुंबईला आल्यावर आपण बोलू. तेव्हा मी जबाब देईल असे मी पोलिसांना बोललो होतो, पण पोलिसांनी ते ऐकले नाही असेही राऊत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – अनिल देसाईंनी दिला सत्तासंघर्षाच्या निकालाचा अंदाज; वर्तवली ‘ही’ शक्यता

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. माझी सुपारी दिल्याप्रकरणी मी गृहराज्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार नाही. तेही खोक्याखाली चिरडून काम करत आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी फडणवीसांवर जे ४० खोके पडले आहेत त्यामुळे त्यांची अवस्था सुद्धा दयनीय झाल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -