घरताज्या घडामोडीपोलीस भरती : उत्तेजक औषधे घेण्याच्या प्रकरणात वाढ, पोलीस सतर्क

पोलीस भरती : उत्तेजक औषधे घेण्याच्या प्रकरणात वाढ, पोलीस सतर्क

Subscribe

नांदेडनंतर रायगडमध्ये देखील भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने उत्तेजक औषध घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील 185 पोलीस शिपाई पदासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस भरतीवेळी उमेदवार उत्तेजक औषध घेतल्याच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलीस विभाग सतर्क झाला असून, 2 जानेवारीपासून पोलीस मैदानावर 185 पोलीस शिपाई पदासाठी कागदपत्र तपासणी आणि छाननी झाल्यानंतर आता मैदानी चाचणी सुरू आहे. (police department alert maharashtra police recruitment nanded raigad palghar cases of taking stimulant drugs are on rise)

नांदेडनंतर रायगडमध्ये देखील भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने उत्तेजक औषध घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील 185 पोलीस शिपाई पदासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान शनिवारी एका उमेदवाराजवळ उत्तेजित करणारे मसल बूस्टर अमली औषध आणि सिरींज आढळून आले होते. त्यानंतर या उमेदवाराला वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याच्या अहवालाची आता पोलिस प्रतीक्षा करीत आहेत. या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे नांदेड पोलिसांनी खबरदारी घेत मैदानावर येणाऱ्या उमेदवारांची आता कसून तपासणी सुरू केली आहे.

नांदेड, रायगडनंतर पालघरमध्येही शनिवारी एका उमेदवाराची संशयावरून पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ऑक्सिबूस्टर हे शक्तीवर्धक औषध आणि रिकामे सिरींज आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर त्याच्यावर पुढील कारवाई होणार आहे. मात्र, पोलीस भरतीसाठी प्रक्रियेसाठी मात्र त्याला अपात्र करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलीस विभाग सतर्क

पोलीस भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सध्या शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येत आहे. पोलिस भरतीत गैरप्रकार टाळण्यासाठी सतर्कतेचे आवाहन नांदेड पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मैदानावर चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची आता कसून तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, गैरप्रकार रोखण्याची पोलिसांकडे यंत्रणाच सध्या नाही. यामुळे पहाटे उठून सराव करणाऱ्या मुलांवर अन्याय तर होत नाही ना असा संशय येऊ लागला आहे. नांदेड पाठोपाठ रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या तिघांकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्या. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन तरुण पुणे जिल्ह्यातील तर एक जण अहमदनगरचा आहे.


हेही वाचा – ‘त्या’ दृष्यांवरून केंद्र सरकारकडून वृत्तवाहिन्यांना चपराक; महिला-बालकांवर होतोय विपरित परिणाम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -