घरमहाराष्ट्रअंबड मध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण

अंबड मध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण

Subscribe

अंबड तालुक्यातील नांदी येथे जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यास आलेल्या पोलिसांवर तिथे उपस्थित असणाऱ्या जमावाकडून हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील नांदी येथे घडली आहे. जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यास आलेल्या पोलिसांवर तिथे उपस्थित असणाऱ्या जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. जमावाने कारवाई करण्यास आलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदी येथे एकच खळबळ उडाली आहे. जमावाच्या हल्ल्यामध्ये पोलिस उपनिरिक्षक सुग्रीव चाटे जखमी झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -