चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक परिसरातल्या डबक्यात तीन मुलं बुडाली? शोधमोहीम अद्याप सुरूच

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तीन मुलं बेपत्ता झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या मुलांचा शोध घेतला असता अल्ट्रटेक परिसरात असलेल्या डबक्याजवळ त्या मुलांचे कपडे मिळाले

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तीन मुलं बेपत्ता झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या मुलांचा शोध घेतला असता अल्ट्रटेक परिसरात असलेल्या डबक्याजवळ त्या मुलांचे कपडे मिळाले. त्यामुळे कदाचीत या डबक्यात बुडून मुलांचा मृत्यू झाला असावा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप या मुलांची माहिती मिळाली नसून, पोलीस युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. (Police have daught about 3 children drowned in puddle in ultratech colony due to Clothes found near the puddle in chandrapur)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यात येणाऱ्या अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी अंदाजे १० वर्षाची तीन मुलं सायंकाळपर्यंत घरी परतली नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुले बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसानी तातडीने तपासाला सुरूवात केली. त्यावेळी पोलिसांनी मुलांच्या शाळेच्या परिसरात तपास केला असता, त्या शाळेच्या म्हणजेच अल्ट्राटेक वसाहतीच्या परिसरात असलेल्या डबक्याच्या शेजारी त्या मुलांचे कपडे सापडले. त्यामुळे संबंधीत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बेपत्ता तीन मुलांचे कपडे सापडल्याने ते या डबक्यात पोहायला गेले असल्याचे बोलले जात असून, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले असतील, अशा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी अधिक तपास केला असता, मुलांचे इतर साहित्यही सापडली. परंतु मुलांची माहिती मिळत नसल्याने तपास सुरूच ठेवला. हा तपास रात्री उशीरा पर्यंत ही शोधमोहीम सुरू होता. मात्र अंधार झाल्याने बचाव पथकाला अडचण येत होती. यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली. आज पहाटे पासून ही शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, डबक्याजवळ मुलांचे कपडे आढळून आले, यामुळे ही मुलं गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही मुलं डबक्यात पोहण्यासाठी गेली असावी आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाचे कर्मचारी व गडचांदूर पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.


हेही वाचा – सख्ख्या बहिणी असल्यास एकीची शालेय फी सरकार भरणार; योगी सरकारचा मोठा निर्णय