बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंना पोलिसांची नोटीस, मनसेची पुढील भूमिका काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत ३ मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच हा अल्टीमेटम आज संपत असून उद्या राज्यात काय परिस्थिती असणार आहे, यासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पोलिसांच्या नोटीसा मिळल्याची माहिती दिली.

शिवाजी पार्क पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी फौजदारी दंड प्रक्रिया सहिता कलम १४९ अन्वये नोटीस देण्यात आली आहे. तसेच ही नोटीस आम्ही स्वीकारली आहे. ज्याप्रमाणे मला नोटीस देण्यात आली आहे. त्याप्रमाणे मनसे नेते नितीन सरदेसाई यांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या नोटीसीचं स्वागत केलं पाहीजे आणि स्वीकारली पाहीजे.

आमची पुढील भूमिका राज ठाकरेंनी जाहीर सभेत मांडली आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे फक्त बोलल्यानंतर जर नोटीसा येत असतील आणि वर्षानुवर्ष परवानगी न घेता कायदा तोडतायत. अनधिकृत मशिदी बांधत आहेत. तसेच भोंगे सुद्धा अनधिकृत पद्धतीने वाजवले जातायत. त्यांच्यावर मात्र कोणत्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे सरकार मुस्लिमांचं त्रुष्टीकरण करण्याचं सरकार आहे. त्यांचा मी धिक्कार करतो.

मनसे नेते नितीन सरदेसाई यांना १८८ची नोटीस देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचं पालन करायचं नाही, असं सरकारने ठरवलेलं आहे. अशा प्रकारच्या नोटीसा आम्हाला आतापर्यंत खूप आल्या. तसेच पक्षाची पुढची भूमिका राज ठाकरे घेणार आहेत, असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : कुणीही मनात आणलं तरी राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही – खासदार संजय राऊत