फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्लांना अभय; खडसेंनी दिले होते क्लीनचिटचे संकेत

माजी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना एकनाथ खडसे, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मात्र, रश्मी शुक्ला यांना सरकारकडून मिळालेल्या दिलास्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अगोदरच संकेत दिले होते.

एकनाथ खडसे, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारून त्यांना एकप्रकारे अभयच दिले आहे. रश्मी शुक्ला यांना सरकारकडून मिळालेल्या दिलाशाबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अगोदरच संकेत दिले होते. (Police Officer Rashmi Shukla In Phon Tapping Case Home Ministry Maharashtra Rejected Demand To Prosecute)

अलिकडेच फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले होते. “ज्या दिवशी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीनचिट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली आहे”, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.

कुलाबा पोलिस स्टेशन येथे काही राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यासंदर्भात आरोपत्र देखील दाखल करण्यासाठी गृहविभागाकडे परवानगीचे पत्र पाठवण्यात आले होते, दरम्यान गृह विभागाने ही परवानगी नाकारली आहे. तसेच, पोलिस कोर्टात आहवाल सादर करणार आणि पोलिस आरोपपत्र मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते, त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या त्यानंतर त्यांच्यावरील ही केस बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी “तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे. मात्र, फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला, हे कारण मला अद्यापही कळले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो, त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया, यासह इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू, अशा धमक्या देण्यात आल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती. तसेच स्वतः पोलिसांनी संरक्षणसुद्धा दिले होते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. याच प्रकरणाची आठवण करून देत खडसेंनी पोलिसांनी अचानक पोलीस संरक्षण काढून घेतलं होते. असा मुद्दा स्पष्ट करत ज्यांनी ५० खोके ज्यांनी घेतली आहेत त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार आहेत”, अशी टीकाही खडसेंनी राज्य सरकारवर केली.


हेही वाचा – ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, सर्वात कमी कार्यकाळाची नोंद