घरमहाराष्ट्रमहिलेला मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित, चित्रा वाघ यांनी मानले सरकारचे आभार

महिलेला मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित, चित्रा वाघ यांनी मानले सरकारचे आभार

Subscribe

अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील सुपा टोल नाक्यावर एका चारचाकी वाहनात बसलेल्या महिलेला एका पोलीस अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याला आता निलंबित करण्यात आले असून यासाठी चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या सुपा टोल नाक्यावर एका महिलेला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला तेही एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सदर घटना टोल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये सुद्धा कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली आहे. या पोलीस अधिकाऱ्याने त्या महिलेला नेमकी का मारहाण केली? याबाबत अद्यापही काहीही खुलासा झालेला नसला तरी, पोलीस निरीक्षक गोकावे असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी दोषी पोलीस अधिकारी गोकावे यांना निलंबीत करण्यात आले आहे. यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरला याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “अहमदनगर जिल्हा सुपा येथील PI गोकावे याने एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली.. सदर घटनेची तात्काळ दखल राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde जी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जीं नी या PI ला निलंबीत केले आहे. राज्यातील समस्त मातृशक्तीकडनं सरकारचे आभार…” असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरच्या व्हिडिओमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

पोलिसांची गाडी सुपा टोल नाक्यावर येऊन थांबली होती. त्या गाडीतून काहीवेळ कोणीच खाली उतरत नाही. काही वेळाने तेथे पुण्याच्या दिशेकडून आलेली एक कार थांबते. कार थांबताच पोलीस गाडीतून एक व्यक्ती खाली उतरून कारमध्ये बसते. थोड्या वेळेने ती व्यक्ती व एक महिला त्या गाडीतून उतरतात व भर रस्त्यावर त्या दोघांच्यात बराचवेळ झटापट होते. याकाळात ती महिला व तो व्यक्ती बोलतात व त्यांच्यात चांगलीच बाचावाची होऊन महिलेला मारहाण होत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आणि धर्मेंद्र यांच्या बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी

दरम्यान, सदरची महिला कोण? याची वेगवेगळी चर्चा पोलीस दलात सध्या सुरु आहे. त्या महिलेला भर रस्त्यात मारहाण करण्याचे कारण काय? याबद्दलची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. सुपा येथील व्यावसायिक व पोलीस निरीक्षकांमध्ये मागील आठवड्यात जोरदार खडाजंगी झाली होती. यात येथील एका व्यावसायिकासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची चर्चा अजूनही थांबलेली नसताना तोच दुसरा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नगरमधील पोलिसांना झालंय तरी काय असा प्रश्न सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -