घरपालघरपालघर समुद्रात पोलिसांची गस्ती बोट बुडाली, मच्छीमारांनी मदतीसाठी घेतली धाव

पालघर समुद्रात पोलिसांची गस्ती बोट बुडाली, मच्छीमारांनी मदतीसाठी घेतली धाव

Subscribe

पालघर (सुमित पाटील) : पालघर समुद्र किनाऱ्यावर एक मोठी दुर्घटना टळली. समुद्रात पेट्रोलिंगसाठी गेलेली पोलीसांची गस्ती बोट अचानक बुडू लागली. पण या गस्ती बोटीच्या मदतीसाठी स्थानिक मच्छीमारांनी तातडीने धाव घेऊन ही बोट किनाऱ्यावर आणली. ही घटना शुक्रवारी दुपारी सुमारास घडली.

पालघर समुद्रात केळवे ते दातीवरे या भागात डहाणू पोलीस स्टेशनच्या अखत्यारित असलेली अशोका बोट शुक्रवारी दुपारी पेट्रोलिंग करत होती. केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोल सागरी भागात पोहोचली असता खराब हवामानामुळे उंच लाटांचे पाणी बोटीत शिरले. दातीवरे गावाच्या समोर समुद्रात 7 नॉटिकल भागात बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे तैनात पोलिसांच्या लक्षात आले. आपल्या स्पीड बोटमध्ये अर्ध्यावर पाणी शिरू लागल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्याच्या बाटल्या कापून त्याद्वारे बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. मात्र समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने तुफानी लाटा उसळत होत्या अशा वेळी बोट लाटावर हेलकावे घेत असल्याने बोटीतील पाणी बाहेर काढणे शक्य होत नव्हते. पाणी बोटीत शिरल्याने त्यांच्या लाईफ जॅकेटसह अन्य साहित्य वाहून गेले होते.

- Advertisement -

मग त्यांमनी तात्कlळ मदतीसाठी सहकाऱ्यांना फोन केला. त्यानुसार सहकारी पोलीस केळवा येथील लक्ष्मीप्रसाद या खासगी बोटीने स्थानिक मच्छीमार व तीन सागर रक्षकासंह केळवा मांगेलावाडा येथील जेटीवरून रवाना झाले. अशोका बोटीवरील पोलिसांनी दिलेल्या जीपीएस लोकेशनद्वारे हे पोलीस व अन्य मच्छीमार तिथे पोहोचले आणि दुपारी चारच्या सुमारास अशोका बोटीवरील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनाचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडके आणि आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल कोल्हे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना सुरक्षितपणे केळवा मांगेलावाडा जेटी येथे आणण्यात आले.

केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, हवालदार वळवी, पोलीस अंमलदार सांबरे, पोलीस अंमलदार साळुंखे, लक्ष्मीप्रसाद बोटीचे मालक हरिश्चंद्र मेहेर, सागर रक्षक दल सदस्य राकेश मेहेर, आतिष मेहेर, चंद्रकांत तांडेल, रुपेश भंडार, विघ्नेश भंडार, रितेश मेहेर हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -