घरक्राइमइगतपुरीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; बिग बॉस फेम महिलेसह २२ जण ताब्यात

इगतपुरीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; बिग बॉस फेम महिलेसह २२ जण ताब्यात

Subscribe

इगतपुरीत रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर शनिवारी (दि.२६)मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी कोकेन ड्रग्जसह रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी एक विदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, २ कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे.
इगतपुरीतील दोन बंगल्यांमध्ये अवैध काम सुरु असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इगतपुरीत छापा टाकला. मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे पोलिसांना समजले. या पार्टीत चित्रपट क्षेत्रातील चार महिला सहभागी असल्याचे समोर आले. त्यात बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये १० पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे. पोलिसांना घटनास्थळी कोकेनसह इतर अमली पदार्थ आढळून आले आहेत. वैद्यकीय तपासणी पोलिसांनी २२ जणांना मुंबईला रवाना केले आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -