घरगणेशोत्सव 2022गणेशोत्सवासाठी पालिकेसह पोलीस, रेल्वे, बेस्ट, एमएमआरडीए, अग्निशमन यंत्रणा सज्ज

गणेशोत्सवासाठी पालिकेसह पोलीस, रेल्वे, बेस्ट, एमएमआरडीए, अग्निशमन यंत्रणा सज्ज

Subscribe

मुंबई महापालिकेने (कोरोनाचे २ वर्षे वगळता) दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व प्राधिकरणांनासह श्रीगणेशाचे आगमन व त्यानंतरच्या विसर्जन सोहळ्यासाठी सर्वतोपरी पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यापासून पूर्व तयारीला सुरुवात केली आहे.

यंदाचा गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. मुंबई महापालिकेने इतर सहाय्यभूत यंत्रणांना हाताशी धरून गणेशोत्सवासाठी जय्यत पूर्व तयारी केली आहे. पालिकेसह सर्वधर्मीय मुंबईकरही श्रीगणेशाच्या, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आणि त्यानंतरच्या विसर्जन तयारीसाठी सज्ज झाले आहेत. (Police Railway BEST MMRDA Fire fighting system are ready for Ganeshotsav 2022)

मुंबई महापालिकेने (कोरोनाचे २ वर्षे वगळता) दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व प्राधिकरणांनासह श्रीगणेशाचे आगमन व त्यानंतरच्या विसर्जन सोहळ्यासाठी सर्वतोपरी पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यापासून पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. पालिकेला गणेश आगमनापेक्षा जास्त तयारी गणेश विसर्जनासाठी करावी लागते.

- Advertisement -

मुंबईत १२ हजार लहान – मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर दीड लाखांपेक्षाही जास्त घरगुती गणेशमूर्तींचे गिरगाव, जुहू, वेसावे, दादर,वरळी, आक्सा, मार्वे खाडी आदी ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि यंदा १६२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी करावी लागते. तसेच, यंदाही मुंबई महापालिकेने फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

पालिकेकडून विसर्जन स्थळी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा

- Advertisement -
  • पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष.
  • प्रमुख विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक तैनात.
  • नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा व्यवस्था.
  • सुसमन्वयासाठी प्रमुख विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्ष
  • अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था.
  • महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका.
  • निर्माल्य गोळा करण्यासाठी ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने.
  • सुरक्षा व्यवस्थेसाठी ४८ निरिक्षण मनोरे व आवश्यक तेथे संरक्षक कठडे.

    महत्त्वाच्या विसर्जन स्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था.

  • गणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध.
  • चौपाट्यांवर श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येणा-या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था.
  • पालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये १६२ कृत्रिम तलाव व्यवस्था.
  • पालिकेचे १० हजार अधिकारी व कर्मचारी तैनात
  • काही ठिकाणी श्रीगणेशमूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
  • उंच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

हेही वाचा – राज्य सरकारकडून पोलिसांच्या घरासाठी नवी योजना, तीन टप्प्यात आराखडा तयार करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -