घरमहाराष्ट्रपोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी; उमेदवारांची मागणी

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी; उमेदवारांची मागणी

Subscribe

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तब्बल तीन वर्षांनंतर राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर केली. यानुसार पुढील काही दिवसात राज्यात जवळपास 20 हजार पोलीस भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. यासाठी उमेदवार अधिक मेहनत घेत आहेत, अशात अर्ज भरण्याची वेबसाइट्च हँग होत असल्याने उमेदवारांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

अनेक उमदेवारांचे अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने काही उमेदवारांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अडचणी येत आहे. सतत शासनाची वेबसाइट स्लो झाल्याने अर्ज कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा राहिला आहे. ग्रामीण भागातून अनेक उमेदवारांना सायबर कॅफेतमध्येच अर्जासाठी रात्र काढावी लागतेय, त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली जात आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारने तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजे नोव्हेंबर 2020 मध्ये पोलीस भरतीची घोषणा केली, मात्र ही भरती प्रक्रिया काही कारणास्तव पुढे ढकलली. ज्यानंतर आता अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली, मात्र मागील तीन वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक उमेदवारांचे अर्ज करण्याचे वय उलटून गेले, त्यामुळे भरती प्रक्रियेतील वय वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. अशा परिस्थितीत उमेदवार आता रात्रंदिवस मेहनत घेऊन भरतीची तयारी करत आहेत. मात्र या भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट चालत नसल्याने उमेदवारांवर मोठे संकट ओढावले आहे, त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी अनेक उमेदरवार करत आहेत. मात्र यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही बापूंच्या ‘काय झाडी.. काय डोंगर..’ डायलॉगची पडली भुरळ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -