घरमहाराष्ट्रपोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष; पुराच्या पाण्यात बस चालवणे आले चालकाच्या अंगलट

पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष; पुराच्या पाण्यात बस चालवणे आले चालकाच्या अंगलट

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, असा इशारा दिला असतानाही एका बसचालकाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत साचलेल्या पाण्यातून नेली. परंतु, साचललेल्या पाण्यात बस चालवणे एका बस चालकाच्या चांगलेच अंगलट आले. (police rescue 35 passenger from travel bus which is stuck in flood at Chandrapur)

राज्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. याच पुरस्थितीचा मोठा फटका चंद्रपुरला बसला आहे. चंद्रपूर येथील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात बस अडकली होती. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. याबाबत विरुर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी धाडसी कामगिरी करत प्रवाशांची सुटका केली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुराच्या पाण्यात अडकलेली बस मध्यपदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बस चालकाला स्थानिक पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितले होते. मात्र, तरीदेखील बस चालकाने पोलिसांच्या या सू दुर्लक्ष करत बस पुढे नेली.

त्यानंतर ही बस पुराच्या पाण्यात बंद पडली. बस पुराच्या पाण्यात बंद पडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होती. पुराच्या पाण्यात बसचा अर्धा भाग बुडाला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

त्यानंतर स्थनिक पोलिसांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. दोऱ्या बांधून बसमधील पुरुष, वृद्ध, लहान मुले व महिला यांची सुखरुपपणे सुटका केली. या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून त्यांना हैदराबादच्या दिशेने रवाना करण्यात आले.


हेही वाचा – वर्षभरात सौर कृषी योजना राबवणार, शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -