घरमहाराष्ट्रडीएसके घोटाळा: फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यास पोलिसांनी मागितली मुदत वाढ

डीएसके घोटाळा: फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यास पोलिसांनी मागितली मुदत वाढ

Subscribe

डीएसके गुन्ह्यातील फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी द्यावा,अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांनी न्यायालयाला दिला आहे.

कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यातील फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी द्यावा,अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांनी न्यायालयाला दिला आहे. पोलीसांकडून ऑक्टोंबर २०१८ मध्ये याप्रकरणाचा फॉरेंसिक रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात येणार होता. मात्र, अद्याप तो सादर झालेला नाही. हा रिपोर्ट येण्यासाठी दोन महिने पुरे आहेत. त्यामुळे रिपोर्टबाबत सरकरी पक्ष चालढकल करीत आहे.

एका महिन्याची मुदत मागितली

डीएसके यांनी ६ कोटी ६५ लाख रुपये जमा केले आहे. त्याचे वाटप कसे करायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाले नाही. तसेच डीएसके यांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यावेळ २२ गुंतवणुकदारांना त्यांच्या रक्कमेचे चेक देण्यात आले होते. ते देखील अद्याप तसेच आहेत, अशी माहिती बचाव पक्षांचे वकील अॅड. श्रीकांत शिवदे यांनी मागील सुनावणी वेळी न्यायालयास दिली होती. त्यामुळे रिपोर्ट सादर करण्यासाठी पोलिसांनी एका महिन्यांची मुदत मागितली आहे.

- Advertisement -

फेब्रुवारीमध्ये डीएसकेंना अटक

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांनी फेब्रुवारी २०१८मध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दिल्ली येथून त्यांना अटक केली होती. डीएसके आणि त्यांच्या पत्नी सध्या येरवडा कारागृहात आहेत. ड्रीम प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवल्यानंतर घराला घरपण देणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या साम्राज्याला घरघर लागली. शिवाय गुंतवणूकदारांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्यासाठी गुंतवणूकदारांचा तगादा लागला. कोर्टाने देखील डी. एस. कुलकर्णी यांना पैसे परत करण्याची ठरविक मुदत दिली. पण, गुतंवणूकदारांना पैसे परत करणे शक्य न झाल्याने अखेर डी. एस. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या – 

डीएसकेंचा धडा वगळा, हेमंत टकलेंची मागणी

डीएसकेंच्या मेव्हणीला ८ दिवसांची पोलीस कोठडी

DSK घोटाळा : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -