आव्हाडांचा ताफा वाहतूक कोडींत अडकला अन् पोलिसांनी उचलला सर्वसामान्यावर हात

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awadh) यांच्या ताफ्याची वाहतूक कोंडीतून (Traffic Jam) सुटका करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने सर्वसामन्य वाहनधारकाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awadh) यांच्या ताफ्याची वाहतूक कोंडीतून (Traffic Jam) सुटका करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने सर्वसामन्य वाहनधारकाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. जितेंद्र आव्हाड हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि याचदरम्यान, ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला असून, पोलीस (Police) कर्मचाऱ्याने सर्वसामान्य वाहनधारकाला मारणे हे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाहतूक कोंडीचा सामना

कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर असताना जितेंद्र आव्हाड हे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले. देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी परतीची वाट धरली. यावेळी भाऊसिंगजी रोडच्या दिशेने जात असताना आव्हाडांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या वाहतूक कोंडीत वाहनांचा ताफा अडकल्याने पोलिसांची प्रचंड ताराबंळ उडाली. त्यामुळे पोलिस तत्परतेने वाहने बाजूला करत होते. दरम्यान, त्यावेळी एका वाहनधारकाला एक पोलीस कर्मचारी आवाज वर करून वाहन बाजूला करण्यास सांगत होता. त्याचवेळी त्याने त्या वाहनधारकाला थेट कानशिलात लगावली.

हेही वाचा – ओबीसी आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातात असते तर मी… – जितेंद्र आव्हाड

खराब रस्त्यांमुळे नेहमीच सर्वसामान्यांचे हाल

ज्या वाहनधारकाला कानशिलात लगावली तो वाहनधारकही या वाहतूक कोंडीत अडकला होता. असे असतानाही या मंत्र्यांच्या ताफ्याला मार्ग देताना संतापलेल्या पोलिसाने या वाहनधारकाला कानशिलात लगावली. दरम्यान, शहरात असलेल्या खराब रस्त्यांमुळे नेहमीच सर्वसामान्यांचे हाल होत असतात. त्यावेळी सतत त्यांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. त्यामुळे सर्वसामन्याची होणारी ही अडचण दुर करायीच सोडून, सर्वसामन्यांवरच हात उचलणे योग्य आहे का, असा सवाल सध्या सर्वसामन्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आता या पोलिसावर कारवाई होणार का हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – गेल्या वर्षभरात बनावट नोटांचा सुळसुळाट; सर्वाधिक आढळल्या 500 रुपयांच्या नोटा