घरमहाराष्ट्रचंद्रपूरमध्ये दारू तस्कराने पोलिसाला उडवले

चंद्रपूरमध्ये दारू तस्कराने पोलिसाला उडवले

Subscribe

दारू तस्कराला अडवणाऱ्या पोलिसाच्याच अंगावर तस्कराने गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. यामघ्ये पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दारूची अवैध तस्करी करणाऱ्या एका गाडीला अडवताना तस्कराने गाडीच अंगावर घातल्यामुळे एका पोलीस निरिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. विशेष म्हणजे दारूबंदी करणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्येच हा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे चंद्रपुरात दारूबंदी पूर्णपणे अंमलात आलेली नाही हे जसं स्पष्ट होतंय, त्याचप्रमाणे तस्करांवर पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याचंही उघड होत आहे.

चंद्रपूरमध्ये दारू तस्करीला मोकळं रान?

चंद्रपूरमध्ये दोन वर्षांपूर्वी दारूबंदी जाहीर करण्यात आली. मात्र, अजूनही जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू तस्करीला आवर घालणं पोलीस प्रशासनाला शक्य झालेलं नाही. मंगळवारीही सकाळी ८च्या सुमारास सहगल नावाचा तस्कर स्कॉर्पिओ गाडीतून दारूची अवैधपणे वाहतूक करत होता. ही माहिती स्थानिक नागभीड पोलिसांना मिळताच त्यांनी पाळत ठेवली.

- Advertisement -

आणि त्याने गाडी थेट अंगावर घातली

संबंधित स्कॉर्पिओ येताच नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपची चिडे यांच्या पथकाने स्कॉर्पिओ गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, तरीही तो न थांबल्याने पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. पण थोड्याच अंतरावर स्कॉर्पिओ आणि एका ट्रकचा अपघात झाल्याने स्कॉर्पिओ थांबली. पोलीस गाडीतून उतरून सहगलला पकडण्यासाठी पुढे सरसावले. पण नेमक्या त्याचवेळी गाडीत दबा धरून बसलेल्या सहगलने स्कॉर्पिओ गाडी थेट पोलीस उपनिरीक्षक चिडे यांच्यावर घातली. या प्रकारात चिडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


हेही वाचा – वेटरच्या वेषातील पोलीसांची बिबट्या तस्करांवर झडप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -