घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस अधिका-याच्या चौकशीतच पैशांची मध्यस्थी पडली महागात

पोलीस अधिका-याच्या चौकशीतच पैशांची मध्यस्थी पडली महागात

Subscribe

नाशिकरोडचा पोलीस कर्मचारी निलंबित, इतरांचीही चौकशी सुरु

नाशिकरोड पोलीस ठाण्यातील कर्मचा-याला एका चौकशी प्रकरणात आर्थिक मध्यस्थी केल्याच्या कारणावरुन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केल्याचे समजते. उच्चपदस्थ अधिका-यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, नाशिकरोडच्या एका पोलीस अधिका-याची खातेअंतर्गत चौकशी सुरु आहे. आयुक्तालयातील चौकशी अधिकारी (डी.ई.) व नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत एक पोलीस कर्मचारी यांनी या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण केल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या प्रकरणात संबंधित कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्याला निलंबित केले. आयुक्तालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे समजते.

गेल्या महिन्यात नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील गोरख खर्जुल प्रकरणात एक अधिकारी व पाच कर्मचा-यांचे निलंबन झाले होते. त्यापूर्वी देवळाली कॅम्प येथील पाच कर्मचारीही कामात कसूर केल्याच्या कारणावरुन निलंबित झाले होते. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गाव चौकीतील एक अधिकारी व कर्मचा-यांची बदली करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आर्थिक देवाण-घेवाणीवरुन झालेल्या निलंबनावरुन पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -