CoronaVirus- कोरोना संदर्भात एप्रिल फुल मेसेज व्हायरल कराल, तर शिक्षा होईल!

सोमवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर कोरोना विषाणू संबंधित अनेक खोटो मेसेल व्हायरल होत आहेत. खोटी माहिती पुरवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशानने १ एप्रिलच्या निमित्ताने एक निर्णय घेतला आहे. “जर कुणी कोरोना विषाणू संबंधित एप्रिल फूल केले तर मेसेज करणाऱ्यावर आणि अॅडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहे”, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

1 एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणिला खोटे मेसेज पाठवणूक फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यंदा एप्रिल फुलमध्ये कोरोना विषाणूं संबंधित चुकीचे मेसेज सेंड केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नसल्याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात ग्रुप ॲडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना याबाबत सूचना द्याव्यात. त्याचबरोबर सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल अशी सेटिंग करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

नाहीतर शिक्षेस पात्र ठराल

कोरोना विषाणू संदर्भात व्हॉट्सअपवर अफवा पसरवल्यास मेसेज पाठवणाऱ्यांना अटक आणि दंडाची शिक्षा करण्यात येणार आहे.