घरमहाराष्ट्रधक्कादायक! नवजात बालक समजून प्लास्टिकच्या बाहुलीचे पोस्टमार्टम!

धक्कादायक! नवजात बालक समजून प्लास्टिकच्या बाहुलीचे पोस्टमार्टम!

Subscribe

गावात नदीकाजवळ नवजात बालक पडलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पोस्टमॉर्टेमसाठी ज्या नवजात बालकाला पाठवले होते, ते खेळण्यातील बाहुली असल्याचे समोर आले आहे. जेव्हा डॉक्टरांच्या पथकाने पोस्टमॉर्टम चालू केले तेव्हा नवजात बालकाच्या शरीरातून कापूस आणि स्पंज बाहेर येण्यास सुरूवात झाली.

असा घडला प्रकार

या विचित्र घटनेची जिल्ह्यात चर्चा होत असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यावेळी असे सांगितले जात आहे की, ते नवजात बालक खेळण्यासारखे आहे हे त्यांना लक्षात कसे आले नाही. तसेच या खेळण्याला कोणी नदीजवळ ठेवले आणि तो कोणाचे डाव तर नसावा असे प्रश्न देखील उपस्थितीत केले जात आहे.

- Advertisement -

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तहसील बोरजवला गावात नदीकाजवळ नवजात बालक पडलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणात पोलिस अधिकारी एस.एल. चव्हाण यांनी सांगितले की, बोरजवला गावच्या पोलिस पाटलांनी मृत बालक सापडल्याची माहिती दिली. मी माझ्या कर्मचार्‍यांसह तिथे गेलो. तेथे आम्ही ७ किंवा ८ महिन्यांचे मृत बालकाला पाहिले. आम्ही मृतदेह उचलला तेव्हा काही लोक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आले. मृतदेह घेऊन आम्ही खामगाव रुग्णालयात पोहोचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी पंचनामा झाल्यानंतर कागदपत्रे तयार केली गेली.

तर डॉ वैद्य म्हणाले की, १० जुलै रोजी सकाळी नवजात मृतदेह पोस्टमार्टमसाठी आणण्यात आला. मी त्वरित तिथे पोहोचलो. जेव्हा मी याची चौकशी केली तेव्हा मला कळले की ते मानवी शरीर नसून प्लास्टिकची बाहुली आहे, कारण त्यातून स्पंज आणि माती आतून बाहेर येत होती, मी अद्यापपर्यंत असे प्रकरण पाहिले नव्हते. हा प्रकार घडल्यानंतर ताबडतोब याची माहिती पिपळगाव राजा पोलिसांना दिली गेली.


अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं अशक्य; राज्य सरकार ठाम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -