Nitesh Rane: पाच तासांच्या चौकशीनंतर नितेश राणे यांना घेऊन पोलीस गोव्यात दाखल

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी कणकवली पोलीस भाजपा आमदार नितेश राणे यांना घेऊन गोव्याला तर यांचे खाजगी सचिव राकेश परब यांना घेऊन कणकवली पोलीस मालवणला रवाना झाले. राकेश परब हे आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक असून संतोष परब हल्ला प्रकरणात संशयीत आरोपी आहेत. त्यांना ही 4 तारीख पर्यंतची पोलीस कोठडी आहे. नितेश राणे यांना घेऊन कणकवली पोलीस निघाल्यानंतर तब्बल एक तासाने राकेश परब यांना बाहेर काढण्यात आलं. जवळपास 5 तास नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना गोव्याला नेण्यात आले.

आमदार नितेश राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब हे देखील कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. गुरुवारी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलिसांनी समोरासमोर चौकशी करण्यात आली. नितेश राणे यांचे शिवसैनिक संतोष परब खुनी हल्ल्यातील मुख्य आरोपी पुणे येथील सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परबच्या मोबाईल वरून संभाषण झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

राकेश परब यांच्या मोबाईलवर सचिन सातपुते यांचे एकूण 38 कॉल आढळून आले आहेत. पोलीस तपासात ही बाब निष्पन्न झाल्यानंतर राकेश परब यांच्या मोबाईल वरून नितेश राणे यांचे सातपुते याच्यासोबत संभाषण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतचा तपास कणकवली पोलिसांनी या दोघांनाही समोरासमोर बसवून केला. यावेळी जे बोलणे झाले ते नेमके कोणत्या मोबाईलवरून झाले याची चौकशी देखील यावेळी करण्यात आली.


हेही वाचा : U.S. Raid In Syria : सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या कारवाईत ISIS चा म्होरक्या ठार, जो बायडनचं मोठं वक्तव्य