Video : ‘नारायण राणेंना भरलेल्या ताटावरुन उठवले’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरल्या ताटावरुन उठवले.

police treated narayan rane badly they didn't even let him eat accuses prasad lad

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वरच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली. या दरम्यान, नारायण राणे यांना धक्काबुक्की करत त्यांना भरलेल्या जेवणाच्या ताटावरुन उठवले असल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. तसेच राणे जेवत असताना त्यांचे भरलेले ताट खेचल्याचे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात नारायण राणे जेवत असताना पोलीस दाखल होऊन त्यांना अटक करण्यास जातात. मात्र, त्याचवेळी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे मध्यस्थी करत अरेस्ट वॉरंट कुठे आहे, याची विचारणा करतात. तर इतर कार्यकर्ते साहेब जेवत असल्याचे ही सांगताना दिसत आहे.

नेमके काय घडले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्त्यावरुन नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेची तयारी सुरु केली. दरम्यान, नारायण राणे हे संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी त्याठिकाणी ते दुपारचे जेवण करत होते. त्याचवेळी पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. तसेच पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेची प्रक्रिया सुरु केली. मात्र, त्यावेळी राणे जेवण करत होते. त्याचवेळी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, ‘साहेबांना हात लावायचा नाही. अरेस्ट वॉरंट दाखवा. साहेब जेवत आहेत’, असे राणेंचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, निलेश राणे यांचा आवाज वाढताच स्वत: नारायण राणे भरलेल्या ताटावरुन उठल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे.


हेही वाचा – रायगड पोलिस नारायण राणेंना घेऊन महाडला रवाना, संगमेश्वर पोलिसांकडून घेतला ताबा