घरदेश-विदेशपोलिओ लसीकरणाला आजपासून सुरुवात

पोलिओ लसीकरणाला आजपासून सुरुवात

Subscribe

कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्याने पोलिओ लसीकरण पुढे ढकलण्यात आले होते. आजपासून पोलिओ लसीकरणावला सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोना महामारिमुळे पल्स पोलिओचे अभियान लांबणीवर पडले. मात्र पल्स पोलिओच्या अभियानाला आज पासून सुरुवात होणार आहे. हे अभियान १७ जानेवारीपासून सुरु केले जाणार होते. कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्याने पोलिओ लसीकरण पुढे ढकलण्यात आले होते. आजपासून पोलिओ लसीकरणावला सुरुवात करण्यात आली आहे. हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

पोलिओ लसीकरणाच्या या मोहिमेअंतर्गत ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. वर्षातून दोन वेळा पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिओ लसीकरण मागे पडले. आजपासून पुढील तीन दिवस ही लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. २ फेब्रुवारी पर्यंत हि लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे.

- Advertisement -

आपल्या मुलांना पोलिओ लसीकरणासाठी घेऊ जाताना कोरोनाच्या पार्श्वूभूमीवर आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. आपल्या मुलांना घेऊन जाताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावणे यासारख्या गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्याचप्रमाणे पोलिओ बुथवर जाताना ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांना घेऊन न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – किमान समान कार्यक्रमाची श्रेष्ठींकडून आठवण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -