राजकीय कलगीतुरा सुरूच

Devendra Fadnavis slams cm uddhav thackeray on state government should not help Konkan

राज्यात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतरही राजकीय नेत्यांमधील कलगीतुरा अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे. शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्योरापांच्या फैरी सुरूच आहेत. खरी शिवसेना कुणाची यावरून दोन्ही गटांतील नेते एकमेकांविरोधात निशाणा साधत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे भाजप आणि इतर सहकारी पक्षांकडूनही विधाने केली जात असल्याने राज्यात सत्तांतरानंतरही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पक्षप्रमुख माझी काय हकालपट्टी करणार?
२९ जूनला पत्रकार परिषद घेऊन पुण्यात माध्यमांसमोर मी माझी भूमिका मांडली होती. त्यावेळी मी म्हणालो होतो की, महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्य नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत फारकत घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही तीच भूमिका होती, मात्र आमच्या मागणीला मातोश्रीने प्रतिसाद दिला नाही. याच कारणासाठी मी एकनाथ शिंदेंसोबत गेलो, पण उद्धव ठाकरे हे करायला तयार नव्हते. मीच आधी शिवसेनेतून बाहेर पडलो असताना पक्षप्रमुख माझी काय हकालपट्टी करणार?

हे सरकार म्हणजे ‘एक दुजे के लिए सिनेमा’
शिवसेनेत बंड केलेल्या बंडखोरांचा राजकीय अंत लवकरच होईल. शिवसेनेतून जे बाहेर गेले, ज्यांनी शिवसेना सोडली ते महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाले. ज्यांना भाजपचा पुळका होता ते निवडणुकीत पराभूत झाले. शिंदे आणि भाजप सरकारला लोकशाहीची भीती वाटत आहे. यापुढे शिवसेनेच्या पंखाखाली येण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुकीच्या मैदानात समोर या. शिंदे सरकार बेकायदेशीर आहे. सरकार स्थापन होऊन इतके दिवस झाले तरी त्यांचे मंत्रिमंडळ होऊ शकले नाही. हे सरकार म्हणजे ‘एक दुजे के लिए’ सिनेमा असून या सिनेमाचा शेवट काय झाला ते सर्वांना माहीत आहे.

फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत
गेल्या अडीच वर्षांत सरकारकडे अनेक मागण्या केल्या. मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षण आदी मुद्दे उपस्थित केले, मात्र ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षण घालविले. मराठा समाजाला फक्त फडणवीसच न्याय देऊ शकतात. देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत.

राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाचे सरकार
गेली अडीच वर्षे आपण वाट बघत होतो. रात्रीनंतर दिवस उजाडतो. आता आपले सरकार आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आले आहे. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा सर्वांना न्याय मिळत होता. आता मराठा समाज आणि ओबीसींना न्याय मिळेल. नवीन सरकारमध्ये “बदला” असे नवीन खाते सुरू करून त्याची जबाबदारी कडक आमदाराकडे द्या आणि गेल्या सरकारमध्ये ज्या मंत्र्यांनी घोटाळे केले त्यांना शोधून काढा.