सोलापूर : राजकीय हस्तक्षेपामुळे आरक्षणाचे गांभीर्य संपत चालले आहे, अशी खंत राज्याचे महसूल मंत्री राधा कृष्णविखे पाटील यांनी सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबले असताना त्यांना धनगर कती समितीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा त्यांना भेटीसाठी राधाकृष्ण विखे पाटील गेल्यावर हा संपूर्ण प्रकार झाला.
भंडारा टाकणे हे खूप सौम्य आंदोलन असून उग्र आंदोलन व्हावे, याला राजकीय रंग येतोय का?, या प्रश्नार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “दुर्दैवाने आरक्षणाचे जे मुद्द्यात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे गांभीर्य संपत चालले आहे. माझी सर्व समाजबांधवांना विनंती आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत आणि धनगर समाजाच्या मुलांनी आज प्रतिकात्मक भंडाऱ्याची उधळूण करून जे प्रतिकात्मक आंदोलन केले. समाजाच्या भावना इतपत आदर करतो. पण याचा काही राजकीय मंडळी गैरफायदा घेत आहेत. ते दुर्दैव आहे. त्यामुळे समजालाही न्याया मिळत नाही. किंबहुना आंदोनल बदनाम करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत.”
हेही वाचा – पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण करणाऱ्यावर कारवाई नको; विखे पाटलांची सूचना
कार्यकर्त्यांना मारहाण झाली, याचे भाजपला परिणाम भोगावे लागतील, अशी धनगर समाजाची प्रतिक्रियेवर राधाकृष्ण पाटील म्हणाले, “एका घटनेने भाजपवर काही परिणाम होईल. त्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना मी त्यांचे निवेदन घेत होतो. निवेदन मी ऐकले नसते. त्यांच्या भावनेचा अनादर केला असता. तर तेव्हा त्यांचे आंदोलन करणे समजू शकतो. मी त्यांची भूमिका घेत असताना, त्यांनी भंडारा टाकाला. ही घटन अचानक घडल्यामुळे सर्वजण गोंधळून गेले होते. एखाद्या समाजाचा व्यक्ती आहे म्हणून त्याला मारहाण करण्याची भूमिका नव्हती.
हेही वाचा – धनगर आरक्षण : धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याने उधळला विखे पाटलांवर भंडारा!
पंकजा मुंडेसंदर्भात विखे पाटील म्हणाले…
पंकजा मुंडे राज्यभर दौरा करत आहेत. पण भाजपनेते त्यांची भेट टाळत आहेत का?, या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे या सोलापूर दौऱ्यावर आहेत. हे मला माहिती नव्हते. वास्तविक माझी त्यांच्यासोबत चर्चा होत राहते आणि पंकजा मुंडे या पक्षाच्या जेष्ठ नेत्या आहेत. यामुळे पंकजा मुंडेंना टाळणे किंवा त्यांना न भेटने हा प्रश्न नाही.”