विनायक मेटेंचा राजकीय प्रवास, सलग 5 वेळा विधान परिषदेचे सदस्य

VINAYAK METE

विनायक मेटे यांचे अपघातात निधन झाले. ते बीडहून मुंबईकडे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह  येत होते. मात्र, खैलापूर टोलनाक्याजवळी बोगद्यात जाताच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने मेंटेंचा जागीच मृत्यू झाला.

मराठा आरक्षण आंदोलनातील भूमिका 

राज्याच्या राजकारणात विनायक मेटे अनेक दशकांपासून सक्रिय होते. शिवसंग्राम पक्षाचे मेटे हे प्रमुख होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही मेटेंची भूमिका महत्त्वाची होती. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असलेले मेटे सलग पाच टर्म विधानपरिषदेवर आमदार होते.

पाचवेळा आमदार –

१९९५ पासून अपवाद वगळता विनायक मेटे विधानपरिषदेचे सदस्य राहिले आहे. २७ वर्षांच्या कार्यकाळात २५ वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली होती. मराठा महासंघाच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत उतरले. सर्वप्रथम भाजप-युती सरकारच्या काळात ते आमदार झाले. त्यानंतर सलग पाच वेळा विधानपरिषद सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.
शिवसंग्राम राष्ट्रवादीत विलीन –
१९९४ च्या निवडणुकीत मराठा महासंघाने युतीला पाठींबा दिला होता. सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांना पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांचे युतीशी बिनसले. त्यांनी यानंतर महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादीत विलिन केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली.
पक्षांतरानंतरही विधानपरिषदेवर संधी –
२०१४ साली त्यांनी शिवसंग्राम पक्ष महायुतीत विलीन केला. भाजपला पाठिंबा दिलेल्या मेटेना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. पक्षांतर केल्यामुळे त्यांची आमदारकीची अर्धी टर्म भाजपने त्यांना दिली. त्यानंतर पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाण्याची संधी भाजपने विनायक मेटे यांना दिली.