घरमहाराष्ट्रPolitical News: जे चर्चेसाठी जातात ते भाजपाचेच होतात; वंचितचा टोला

Political News: जे चर्चेसाठी जातात ते भाजपाचेच होतात; वंचितचा टोला

Subscribe

प्रिय काँग्रेस आम्ही कोणाशी बोलावं, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी प्रश्न विचारला आहे

मुंबई: प्रिय काँग्रेस आम्ही कोणाशी बोलावं, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी प्रश्न विचारला आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचितशी युती करण्यासाठी चर्चा करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, तेच भाजपात गेले. आता 2024 च्या लोकसभेसाठी अशोक चव्हाणांना काँग्रेसने चर्चेसाठी नेमलं, तर तेही भाजपात गेले. मग आता आम्ही कोणाशी बोलावं, असा टोलाच अंजली आंबेडकर यांनी लगावला आहे. (Political News Those who go for debates belong to BJP criticized by Vanchit Aaghadi leader Anjali Ambedkar)

लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांआधी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षालाही खिंडार पडताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisement -

अंजली आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना व्हीबीएशी युतीच्या चर्चेसाठी नियुक्त केले होते. ते भाजपामध्ये गेले. 2024 च्या निवडणुकीसाठी, अशोक चव्हाण यांना केवळ आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेसनेच नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही नियुक्त केले होते. ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रिय काँग्रेस, कोणाशी बोलावे? तुमचे नेमलेले नेते भाजपाकडे झुकत आहेत.

- Advertisement -

महाविकास आघाडीकडून वंचितला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी वंचितकडून येत असलेल्या अटींमुळे चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. आतापर्यंत सातत्याने वंचितकडून काँग्रेसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीलासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शवला होता. जेव्हा पहिल्यांदा चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले, त्यावेळीसुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये मानापमानाचे नाट्य रंगलं होतं.

(हेही वाचा: Loksabha 2024: सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत? रायबरेली मतदार संघातून ‘या’ नेत्याला उमेदवारीची शक्यता)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -