घरमहाराष्ट्रPolitical News: काँग्रेसचे लातूर, चंद्रपूर आणि अमरावतीचे दिग्गज नेतेही भाजपात जाणार; 'या'...

Political News: काँग्रेसचे लातूर, चंद्रपूर आणि अमरावतीचे दिग्गज नेतेही भाजपात जाणार; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Subscribe

अशोक चव्हाण यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबतच लातूरचे, अमरावतीचे आणि चंद्रपूरचे दिग्गज नेते तसंच,  त्यांच्यासह अनेक आमदार हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत, असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहा दशकांपेक्षा जास्त काळांहून असलेली काँग्रेसची साथ सोडली. त्यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे आज दुपारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वत: प्रसारमाध्यमांसमोर येत ही माहिती दिली आहे. (Political News Veteran Congress leaders from Latur Chandrapur and Amravati will also join BJP Excitement by the claim of this leader)

महिन्याभरात महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. याआधी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी हे 4 ते 5 दशकांपासून काँग्रेससोबतच होते. ज्या नेत्यांनी काँग्रेस उभारण्यास सिंहाचा वाटा उचलला, त्यांनीच काँग्रेसचा हात सोडला. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता काँग्रेसमधून गेल्यानंतर आता आणखी काही दिग्गज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं, बोललं जात आहे. अशा चर्चा असतानाच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

- Advertisement -

राजीनाम्यानंतर चव्हाणांचं वक्तव्य

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते यांनी काल (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर सध्या मला कोणाची उणीधुळी काढायची नाहीत, असं अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. त्याशिवाय काँग्रेसमधील कोणत्याही आमदारांशी संपर्क साधलेला नाही, असंही ते म्हणाले होते.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानं, पक्षाला हा मोठा धक्का मानला जात असतानाच, काँग्रेसचे लातूर, चंद्रपूर आणि अमरावतीचे दिग्गज नेतेही पक्ष सोडणार असल्याचा दावा, शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी केला आहे.

- Advertisement -

बांगर म्हणाले की, अशोक चव्हाण यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबतच लातूरचे, अमरावतीचे आणि चंद्रपूरचे दिग्गज नेते तसंच,  त्यांच्यासह अनेक आमदार हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत, असं संतोष बांगर म्हणाले.

आज जाहीर प्रक्षप्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 किंवा 12.30 ला मुंबईतील भाजपाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. तसंच, अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखीही काही आमदार जाणार असल्याची चर्चा आहेत. आता काँग्रेसचे कोणते नेते त्यांच्यासोबत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचा: Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -