घरमहाराष्ट्रयापुढे होणार दूरदर्शन,आकाशवाणीवरून राजकीय पक्षांचा प्रचार

यापुढे होणार दूरदर्शन,आकाशवाणीवरून राजकीय पक्षांचा प्रचार

Subscribe

निवडणूक‍ आयोगामार्फत राजकीय पक्षांना प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप; ७ राष्ट्रीय आणि ५२ राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रचाराची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहे. मात्र आता याच निवडणुकांसाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर असणाऱ्या पक्षांसाठी दूरदर्शन तसेच आकाशवाणीवर राजकीय प्रचार करता येणार आहे. हा राजकीय प्रचार करण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाकडून प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप करण्यात आले आहे. आयोगामार्फत ७ राष्ट्रीय आणि ५२ राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचाराचे तास कसे असतील हे ठरवून देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाकडून पक्षांना प्रचारासाठी दिला वेळ

२०१४ या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार आयोगाने दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना वेळ आखून दिला आहे. राजकीय पक्षांना ५२० ते १८० मिनिटांपर्यंतचा अवधी प्रचारासाठी मिळणार आहे. ७ राष्ट्रीय पक्षांना प्रचारासाठी राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण ६०० मिनिटे मिळणार असून प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण ९०० मिनिटे मिळतील. ५२ राज्यस्तरीय पक्षांना प्रचारासाठी प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण १ हजार ८०० मिनिटे मिळतील तर राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण ५२० मिनिटे मिळतील.

- Advertisement -

दूरदर्शन-आकाशवाणीवरील वेळ

राष्ट्रीय पक्षाला दूरदर्शनवर प्रचारासाठी राष्ट्रीय वाहिनीवर १० तास टप्प्याटप्प्याने देण्यात आला आहे. तर १५ तास प्रादेशिक वाहिनीवर मिळेल. राज्यस्तरीय पक्षाला प्रादेशिक वाहिनीवर ३० तास प्रचारासाठी मिळतील. राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे ८ तास ४० मिनिटेही प्रचारासाठी मिळतील. राष्ट्रीय पक्षाला आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावर प्रचारासाठी १० तास तर प्रादेशिक वाहिनीवर १५ तास, राज्यस्तरीय पक्षाला आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर ३० तास प्रचारासाठी मिळणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे ८ तास ४० मिनिटेही प्रचारासाठी मिळणार आहे.

टप्प्याटप्प्याने तासाचे विभाजन

राष्ट्रीय पक्षांना दूरदर्शन राष्ट्रीय वाहिनीवर १० तास टप्प्याटप्प्याने मिळतील तर १५ तास प्रादेशिक वाहिनीवर मिळतील. राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक वाहिनीवर ३० तास प्रचारासाठी मिळतील. राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे ८ तास ४० मिनिटेही प्रचारासाठी मिळतील. राष्ट्रीय पक्षाला आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावर प्रचारासाठी १० तास तर प्रादेशिक वाहिनीवर १५ तास मिळतील. तर राज्यस्तरीय पक्षाला आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर ३० तास प्रचारासाठी मिळतील. याव्यतिरिक्त राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे ८ तास ४० मिनिटे देखील प्रचारासाठी मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -