राजकीय सूडबुद्धीने कारवाया सुरू; अनिल परब प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातायत. त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय लोकांच्या पक्षांवर आहे. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

Sanjay Raut

मुंबईः अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

ज्या प्रकारचे आरोप ईडीकडून अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातायत. त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय लोकांच्या पक्षांवर आहे. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

नेमकं काय आहे प्रकरण?

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स आणि सी कोच हे अनधिकृत असून, तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या प्रकरणात आता परिवहन मंत्री अनिल परबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीकडून अनिल परब यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक प्रकरणांवर परब यांची चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख आणि अनिल परब यांना पोलीस बदल्यांमधील पैसे दिले असल्याचा जबाब सचिन वाझेने दिला आहे. यामुळे अनिल परब अडचणीत आले आहेत. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. दापोलीची जागा 1 कोटी 10 लाखांना पुण्यातील विभास साठे यांच्याकडून अनिल परब यांनी घेतली. ती घेताना 1 कोटी रुपये अधिकृत पैसे दिले आहेत. परंतु बांधकामासाठी 7 ते 8 कोटींचा खर्च लागणार होता. परंतु कागदोपत्री केवळ 1 कोटी रुपयांचा व्यवहार दाखवला आहे. यामुळे ईडीने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचाः आता अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, किरीट सोमय्यांचा इशारा