घरताज्या घडामोडीदुर्दैव... 'महाराष्ट्र शाहीर'ऐवजी 'द केरला स्टोरी'ला राजकीय पाठिंबा, दिग्दर्शकांकडून नाराजी व्यक्त

दुर्दैव… ‘महाराष्ट्र शाहीर’ऐवजी ‘द केरला स्टोरी’ला राजकीय पाठिंबा, दिग्दर्शकांकडून नाराजी व्यक्त

Subscribe

मागील काही दिवसांपासून ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाची चर्चा जोरदार रंगत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल शाह यांची निर्मिती असलेल्या द केरला स्टोरीच्या वादाचे राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्वीट करत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?, असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शाहीर या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला आहे. अजूनही हा सिनेमा महाराष्ट्रातील थिएटरमध्ये तुफान गर्दीत सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहिला आणि कौतुकही केलं. परंतु महाराष्ट्र शाहीर सारखा महत्त्वाचा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी द केरला स्टोरी सारख्या सिनेमाला प्रमोट करतायत, असं म्हणत केदार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

दरम्यान, काश्मिर फाईल्स सारखंच ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. या सिनेमातून लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि दहशतवादाचा भयानक चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न सिनेमाच्या दिग्दर्शकांनी केला आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने ८ कोटींचा गल्ला जमवला आहे.


हेही वाचा : शरद पवार पुन्हा भिजले पावसात, सोलापुरात अवकाळी पाऊस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -