घरमहाराष्ट्र"सत्तासंघर्षावर राज्यातील राजकारणी पंडितांनी निर्णय दिलाय.."; फडणवीसांचा विरोधकांना टोला

“सत्तासंघर्षावर राज्यातील राजकारणी पंडितांनी निर्णय दिलाय..”; फडणवीसांचा विरोधकांना टोला

Subscribe

राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च निकाल सुप्रीम कोर्टाकडून राखून ठेवण्यात आला आहे. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लागलेले आहे. पण हा निकाल आमच्याबाजूनेच लागणार असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च निकाल सुप्रीम कोर्टाकडून राखून ठेवण्यात आला आहे. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लागलेले आहे. पण हा निकाल आमच्याबाजूनेच लागणार असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. तर निकाल काहीही लागू द्या, सरकार स्थिर राहणार आहे, असे मत भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोल लगावत आम्ही या निकालाबाबत आशावादी आहोत, असे मत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.

हेही वाचा – सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ; घरांच्या संगणकीय सोडतीत मुख्यमंत्र्यांकडून भावना व्यक्त

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासंघर्षावरील प्रश्नाला उत्तर देत म्हंटले की, “सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच राज्यातले काही पॉलिटीकल पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला. त्याच्यावर पुढचे कॉम्बिनेशन ही करून टाकले. त्याच्यावर सरकार ही तयार करून टाकलं. मला असं वाटतं की, हे योग्य नाहीये. सुप्रीम कोर्ट हे फार मोठं कोर्ट आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाहीये, आम्ही सगळं कायदेशीर केलयं. त्यामुळे योग्य निर्णय येईल, अशी आमची अपेक्षा आहे,” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 10 मे) वर्धा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामपूर्व बैठक घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित आणि शेती बियाणांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात खरीप पिकांसाठी आवश्यक असलेली बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. खतांचा साठा देखील उपलब्ध आहे. यावर्षी येण्याची शक्यता पाहता या ठिकाणी कापसाचे क्षेत्र कमी करून सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्र कसे वाढवता येईल, जेणेकरून पावसाला उशीर झाला तरी उशीरा पर्यंत पेरण्या करता येतील. या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच, दुबार पेरणीची वेळ आलीच तर बियाणे आणि खते उपलब्ध राहतील याचेही नियोजन करण्यात आलेले आहे. तर पिकांवर जो कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी 250 शेतीशाळा नियोजीत करण्यात आलेल्या आहेत. ज्याच्या माध्यमातून कीड रोखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी जपून ठेवा…
जे घरगुती बियाणे आहेत. त्याची उगवण क्षमता योग्य प्रकारे मोजणी करून 70 टक्क्याच्यावर असली तरचं त्याला प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतचं बाहेरून खरेदी करण्यात येणाऱ्या बियाणांत फसवणूक झाली तर पुरेशी भरपाई मिळते. त्यामुळे बियाणे खरेदीची पावती जपून ठेवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले आहे. तर याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत. तसेच अनधिकृत बियाणांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -