घरमहाराष्ट्रराजकारण्यांचं रक्षाबंधन; पाहा फोटो

राजकारण्यांचं रक्षाबंधन; पाहा फोटो

Subscribe

सर्वसमान्यांपासून ते राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी सुद्धा आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा केली आहे. सध्या त्यांच्या रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

आज सगळीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. सर्वसमान्यांपासून ते राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी सुद्धा आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा केली आहे. सध्या त्यांच्या रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे रक्षाबंधन साजरा केली.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शालेय विद्यार्थींनींसोबत रक्षाबंधन साजरा केला. यादरम्यानचे काही फोटो त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटलवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “प्रेम, रक्षा आणि विश्वासाचे प्रतीक असलेली राखी रक्षाबंधनाच्या निमित्ताने बांधली.”

- Advertisement -

 

- Advertisement -

मुंबई महानगर पालिकेतील परिचारिका आणि डॉक्टर्स यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवास स्थानी जाऊन भेट घेतली. आणि त्यांना राखी बांधून स्वतःच्या भावना व्यक्त केल्या.

भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी देखील त्यांच्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरा केला.यादरम्यानचे काही फोटो त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटलवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “बंध हे सुरक्षेचे,बंधुत्वाच्या भावनांचे,आयुष्यभर जपण्याचे..!रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी माझ्या बहीणींनी राखी बांधली, त्यांना रक्षणाचे वचन दिले. आजन्म त्यांची सोबत अशीच लाभावी हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -