घरमहाराष्ट्रPolitics : मुंबईत भाजपाचे 'शतप्रतिशत'चे लक्ष्य; जे. पी. नड्डांकडून निवडणूक तयारीचा आढावा

Politics : मुंबईत भाजपाचे ‘शतप्रतिशत’चे लक्ष्य; जे. पी. नड्डांकडून निवडणूक तयारीचा आढावा

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईत 2014 आणि 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती करून मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्य आणि मुंबईतील नेत्यांसमोर ठेवले आहे. महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका. जनतेत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवा. नवमतदार आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचा, अशा सूचनाही जे. पी. नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. (Politics  BJPs hundred percent target in Mumbai J P Naddas Review of election preparations)

हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जे. पी. नड्डा आजपासून दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. आजच्या पहिल्या दिवशी जे. पी. नड्डा यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘चारसौ पार’चे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईतील लोकसभेचे सहाही मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. महायुतीच्या माध्यमातून या सहाच्या सहा जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे. आजच्या बैठकीत नड्डा यांनी मुंबईतील निवडणूक तयारीचा आणि मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि विरोधकांच्या चुका देखील लक्षात आणून द्या, असे नड्डा यांनी बैठकीत सांगितले. कार्यकर्त्यांशी संपर्क, मीडिया व्यवस्थापन, वाहन व्यवस्था, महत्त्वाच्या नेत्यांच्या सभेचे आयोजन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि समाजातील प्रमुख व्यक्तींचा सहभाग याबद्दल नड्डा यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

- Advertisement -

हेही वाचा – Jarange VS Baraskar : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’

मुंबईत भाजपाची ताकद होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आल्याने त्यात वाढच झाली आहे. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. सध्या मनसेलाही सोबत घेण्याच्या चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद मुंबईत अजूनही आहे. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक या भाजपा तसेच महायुतीसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे भाजपाचे मुंबईवर विशेष लक्ष असून यासाठीच नड्डा याचा मुंबईचा दोन दिवसांचा दौरा आयोजित केला आहे. दरम्यान, आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -