घरमहाराष्ट्रPolitics: शिवसेनेसमोर काँग्रेसचे लोटांगण; आठवड्याभरात निर्णय घेणार,निरुपम यांचा अल्टिमेटम

Politics: शिवसेनेसमोर काँग्रेसचे लोटांगण; आठवड्याभरात निर्णय घेणार,निरुपम यांचा अल्टिमेटम

Subscribe

मुंबई: शिवसेनेसमोर काँग्रेस शरण गेलं आहे. सध्या काँग्रेसला सध्या श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मागच्या 15 दिवसांत माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नाही. मुंबईतल्या 6 पैकी 5 जागा शिवसेनेला दिल्या आहेत. त्यामुळे मी आता फक्त आठवडाभर पक्ष नेतृत्त्वाची वाट पाहणार आहे. त्यानंतर मला अनेक पर्याय खुले आहेत. मी माझा निर्णय घेणार, असं खुलं अल्टीमेटमच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिलं आहे. (Politics Congress bows before Shiv Sena Will take a decision within a week Sanjay Nirupam s ultimatum)

मी फार फार तर अजून एखादा आठवडा वाट पाहीन. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझ्यासमोर आता सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आरपारची लढाई होईल. येत्या आठवड्याभरात तुम्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते, असं सांगतं संजय निरुपम यांनी एकप्रकारे काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आता ते कोणता पर्याय निवडणार? भाजपात जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातील 17 उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. मात्र ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट दिलं आहे. विद्यामान खासदार गजानन कीर्तिकर यांचे ते सुपूत्र आहेत. गजानन कीर्तिकर शिंदे गटासोबत आहेत. मुलगा अमोल उद्धव ठाकरे गटामध्ये आहे. मात्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम संतापले आहेत. निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी होती. आज पत्रकार परिषदेत त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. खिचडी चोर उमेदवारीसाठी मी काम करणार नाही, अशी शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

(हेही वाचा: Lok Sabha : शाहू महाराजांमुळे वाद न घालता कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली – संजय राऊत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -