Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रPolitics : सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यांना अर्थसहाय्य; अशोक चव्हाणांना गिफ्ट, मात्र पंकजा मुंडेंना...

Politics : सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यांना अर्थसहाय्य; अशोक चव्हाणांना गिफ्ट, मात्र पंकजा मुंडेंना मदत नाही

Subscribe

मुंबई : राज्य सहकारी बँकेने सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांसाठी तिजोरी उघडली आहे. यात युती सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या साखर सम्राटांना सुद्धा भरघोस मदत देण्यात आली आहे. मात्र भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्यासमोर संकट असतानाही त्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांची पंकजा मुंडेवरील नाराजी कायम असल्याचे संकेत मिळताना दिसत आहेत. (Politics Funding the factories of ruling leaders Gift to Ashok Chavan but no help to Pankaja Munde)

हेही वाचा – Sharad Pawar : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पवारांकडून जेवणाचे निमंत्रण; अजितदादा जाणार?

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती. 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणात ही नोटीस होती. त्यानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याची 61 लाख 47 हजार रुपयाचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ)ची रक्कम न भरल्यामुळे ईपीएफओ कार्यालयाने ही नोटीस बजावली आहे. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यांसमोर संकटे असतानाही त्यांना मदत मिळाली नाही. परंतु युती सराकरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या साखर सम्राटांच्या साखर कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

चव्हाणांच्या कारखान्याला थकहमी पोटी 147.79 कोटींची मदत

काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपाने राज्यसभेत पाठवल्यानंतर आता दुसरे गिफ्ट दिले आहे. त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याला थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची मदत केली आहे. याशिवाय काँग्रेसमध्ये असलेले आणि भाजपाला सातत्याने मदत करणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित प्रशांत काटे यांच्या कारखान्याला मदत केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election : भाजपा जिंकल्यावर लाकडे गोळा करावी लागतील; ममतांनी सांगितले कारण…

‘या’ कारखान्यांनाही राज्य सरकारकडून मदत

  1. सोलापूरमधील पडसाळी येथील धनाजीराव साठे यांच्या संत कुरुमदास सहकारी कारखाना या कारखान्यास 59.49 कोटींची मदत
  2. पंढरपूरमधील भाळवणी येथील कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्यास 146.32 कोटींची मदत
  3. बीडमधील गेवराई येथील अमरसिंह पंडित यांचा जय भवानी सहकारी साखर कारखान्यास 150 कोटींची मदत
  4. प्रशांत काटे यांच्या इंदापूरमधील छत्रपती सहकारी साखर कारखान्यास 128 कोटींची मदत
  5. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माळशिरस येथील शंकर सहकारी साखर कारखान्यास 113.42 कोटींची मदत
  6. हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्यास 150 कोटी, तर निरा भिमा सहकारी साखर कारखान्या शहाजी नगरला 75 कोटी रुपयांची मदत
  7. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्या लातूरमधील शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारीला 50 कोटी रुपयांची मदत
  8. रावसाहेब दानवे यांच्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्यास 34.74 कोटी रुपयांची मदत
  9. धनंजय महाडीक यांच्या सोलपूरमधील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यास 126.38 कोटी रुपयांची मदत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -