घरमहाराष्ट्रPolitics: खिचडी चोराचा प्रचार करणार नाही; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवर निरुपम यांची नाराजी

Politics: खिचडी चोराचा प्रचार करणार नाही; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवर निरुपम यांची नाराजी

Subscribe

मुंबई: महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 17 जणांना उमेदवारी दिली आहे. यात मुंबई वायव्य या मतदार संघातून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यावर कोविड काळात खिचडी घोटाळा केल्याचे आरोप आहेत. यावर बोट ठेवत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खिचडी चोराचा प्रचार करणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. (Politics Khichdi thief will not promote Sanjay Nirupam s displeasure over Amol Kirtikar s candidature)

त्यामुळे शिवसेनेने जाहीर केलेल्या, भष्टाचाराचे आरोप असलेल्या उमेदवाराच्या नावाबद्दल आमच्या सर्वोच्च नेतृत्वाने आक्षेप नोंदवावा, अशी मी अपेक्षा करतो. आपल्या नेतृत्वाला आता मुंबई आणि संपूर्ण देशाची चिंता राहिलेली नाही. गेल्या 10 दिवसांपासून आम्ही कोणाशीही बोललो नाही. आपल्या कार्यकर्त्यांना न्याया मिळतो की नाही, याची चिंता नाही. तुमची काय अपेक्षा आहे, असं कोणीही एकदाही विचारलेलं नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मी अपेक्षा केली होती, मी माझ्या क्षेत्रात 5 वर्षांपासून सक्रिय आहे आणि मला लढण्याचा अधिकार आहे. अजून आठवडाभर मी वाट पाहीन, नाहीतर माझ्यासमोरचे सर्व पर्याय खुले आहेत, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.

मी फार फार तर अजून एखादा आठवडा वाट पाहीन. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझ्यासमोर आता सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आरपारची लढाई होईल. येत्या आठवड्याभरात तुम्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते, असं सांगतं संजय निरुपम यांनी एकप्रकारे काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आता ते कोणता पर्याय निवडणार? भाजपात जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha : सांगली, ईशान्य मुंबई जागेवरून मविआत धुसफूस; ठाकरेंना फेरविचार करण्याची विनंती)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -