घरमहाराष्ट्रPolitics: ते राजकारणातले कर्ण, विरोधकांचा अपेक्षाभंग झाल्याने कोल्हेकुई; प्रकाश महाजनांची सारवासारव

Politics: ते राजकारणातले कर्ण, विरोधकांचा अपेक्षाभंग झाल्याने कोल्हेकुई; प्रकाश महाजनांची सारवासारव

Subscribe

राज ठाकरे हे राजकारणातील कर्ण आहेत. त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे त्यांची ही कोल्हेकुई सुरू असल्याचं प्रकाश महाजनांनी म्हटलं.

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यांनी ही भूमिका घेतल्यानंतर अनेकांनी त्याचं स्वागत केलं. तर अनेक ठिकाणहून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. विशेषत: ठाकरे गटाने राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. असं सगळं सुरू असताना मनसैनिक मात्र राज ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं दिसून येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंवर होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तरं दिली आहेत. आता असंच उत्तर कट्टर मनसैनिक प्रकाश महाजन यांनी दिलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.(Politics MNS Leader Prakash Mahajan Answered to Uddhav Thackeray and Other Opposition who trolls Raj Thackeray)

राज ठाकरे हे राजकारणातील कर्ण आहेत. त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे त्यांची ही कोल्हेकुई सुरू असल्याचं प्रकाश महाजनांनी म्हटलं.

- Advertisement -

कार्यकर्ते संभ्रमात नाहीत

राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत का, असं विचारल्यावर प्रकाश महाजन म्हणाले की, कार्यकर्ते संभ्रमात नाहीत. राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.

मनसेचे हिंदुत्व हे शरीरावर चिटकलेल्या त्वचेसारखे आहे. राज ठाकरेंना माहीत नव्हते का की त्यांच्यावर टीका होणार आहे? तरीही त्यांनी ही भूमिका का घेतली, हे समजून घ्या, असं महाजन म्हणाले.

- Advertisement -

राज ठाकरे हे राजकारणातले ‘कर्ण’

प्रत्येक लोकसभेवेळी राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर प्रकाश महाजन यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, भूमिका बदलणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. फक्त राज ठाकरेंनी भूमिका बदलली की त्यावर टीका करायची? राज ठाकरे हे आधुनिक काळातील राजकारणातले कर्ण आहेत. द्वापार युगात कर्णाची कवचकुंडलं मागण्यासाठी भिक्षुकाच्या वेशात इंद्र आला होता. त्यांना माहीत होतं भिक्षुकाच्या वेशात इंद्र त्याचे कवच कुंडल मागायला आला आहे. तरीही त्याने ती देऊ केली. हिंदुत्वाच्या नावावर जर कोणी राज ठाकरेंकडे मदत मागायला आलं तर राज ठाकरे यांनी ती मदत खुलेपणाने दिली. हिंदुत्वाची शाल पांघरून आलेल्या लोकांना आम्ही मदत दिली आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : काँग्रेसच सांगतंय – आमच्या उमेदवाराला व्होट देऊ नका! नेमकं काय आहे प्रकरण?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -