घरमहाराष्ट्रPolitics of Baramati : सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत; पण हाती...

Politics of Baramati : सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत; पण हाती घड्याळ की कमळ?

Subscribe

मुंबई : बारामतीसह सातारा, शिरुर आणि रायगड या जागा लढवणार, अशी घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाने केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भक्कम बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीवर कोणाचे प्रभूत्व राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर, अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी आणि बारामती मतदारसंघावर भाजपाने केलेला दावा लक्षात घेता, सुनेत्रा पवार यांच्या हाती घड्याळ असेल की कमळ, याबाबतची उत्सुकता आहे.

हेही वाचा – Baramati Lok Sabha Elections : अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले…

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय मंथन शिबिर कर्जत येथे झाले. त्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांचा थेट उल्लेख न करता, ‘वरिष्ठां’नी सातत्याने आम्हाला गाफिल ठेवले, अशी टीका केली. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासोबतच आहे. तर, शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे श्रीनिवास पाटील हे साताऱ्याचे खासदार आहेत. तर, ज्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण होत राहतो आणि सध्या शरद पवार गटात असलेले डॉ. अमोल कोल्हे हे लोकसभेत शिरूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या गेल्या तीन टर्मपासून खासदार आहे. आता अजित पवार यांनी या जागेवर उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. पवार कुटुंबाचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात याच कुटुंबातील उमेदवार असेल, एवढे नक्की. त्यामुळे अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार किंवा त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी पार्थ पवार यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad vs Patel : लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं; शरद पवारांचा पटेलांना टोला

विशेष म्हणजे, बारामतीमध्ये अलीकडेच सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. यात सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. तर, माझ्याविरोधात कोणीही निवडणूक लढवू शकते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या नावची चर्चा रंगली आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की, त्या राष्ट्रवादीच्या पारंपरिक घड्याळ चिन्हा वर निवडणूक लढविणार की, भाजपाच्या कमळ चिन्हावर?

भाजपाचाही बारामती मतदारसंघावर डोळा आहे. भाजपाने हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. लोकसभेच्या 16 जागांवर लक्ष असून त्यात बारामतीचाही समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षीच जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी गाठीभेटी देऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. त्यांनी तिथे केलेल्या वक्तव्यावरून त्यावेळी विरोधी पक्षनेता असलेल्या शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे भाजपा नेत्याने म्हटले आहे, पण आमचे तिथे काम असल्यामुळे खरेच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन, असा इशाराही त्यांनी दिला होता.

हेही वाचा – Sharad Pawar : निवडणुका झाल्यानंतर एक नवी फळी दिसेल; आमदार बैठकीत शरद पवाराचं वक्तव्य

दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट सत्तेत सहभागी झाला. या अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. याची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. या सुनावणीअंती जर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह गोठवले तर, अजित पवार यांच्यासमोर समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत नवा पक्ष आणि चिन्ह घेऊन आपण पुन्हा उभे राहू, असा निर्धार शरद पवार यांनी आधीच केला आहे. त्यामुळे भाजपाने केलेली तयारी लक्षात घेता, सुनेत्रा पवार यांच्या कमळ येण्याची दाट शक्यता आहे.

सुप्रिया सुळे मतदारसंघ बदलणार?

एकीकडे, बारामतीत पवार कुटुंबातच लढत होणार अशी चिन्हे दिसत असताना, साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आणखी एक चर्चा रंगली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी आधी प्रतिनिधित्व केलेल्या बारामती या लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच विदर्भातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने पावन झालेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल, असे त्या म्हणाल्या होत्या, हे उल्लेखनीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -