घरमहाराष्ट्रPolitics: प्रकाश आंबेडकरांना नाही म्हणणं जड जातं; जरांगेंचं सूचक वक्तव्य

Politics: प्रकाश आंबेडकरांना नाही म्हणणं जड जातं; जरांगेंचं सूचक वक्तव्य

Subscribe

मुंबई: सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. आज महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते. यावेळी वंचित आघाडीने राज्यातील एकूण 48 लोकसभा जागांपैकी 27 जागा वंचितला द्या, अशी मागणी केली आहे. तसंच, महाविकास आघाडीने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आंबेडकरांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारलं असता, जरांगे पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, आंबेडकरांना नाही म्हणणं थोडं जड झालंय. (Politics Prakash Ambedkar finds it hard to say no Manoj Jarange indicative statement)

काय म्हणाले जरांगे पाटील?

उद्या मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत आहे. त्यानंतर 2 दिवस जवळच्या लग्नकार्यासाठी गावाकडं जात आहे, असं जरांगे यांनी सांगितलं. तसंच आंबेडकर यांच्या भेटीवर भाष्य करताना, प्रकाश आंबेडकर यांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं. पण, माझं त्यांना आदरपूर्वक म्हणणं आहे. माझा सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे, सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं, याकडे आहे. माझा राजकीय मार्ग नाही, माझा सामादिक मार्ग आहे. मी हा लढा समाजासाठी उभाा केलेला आहे, असं म्हणत राजकीय भूमिका घेणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

या जागांवर झाली चर्चा 

आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी वंचितनं 27 जागांवरक दावा केला. यात मुंबई, उत्तर मध्य, मुंबई सेंट्रल, उत्तर पूर्व, अकोला, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोशी, शिर्डी, रामटेक, सातारा, अमरावती, नागपूर, भंडारा- गोंदिया, चंद्रपूर, नाशिक, मावळ, धुळे, रावेर, नांदेड, बुलढाणा, वर्धा या जागांचा समावेश आहे.

(हेही वाचा:Serial Bomb Blast: 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी निर्दोष! अजमेर कोर्टाचा निकाल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -