घरमहाराष्ट्रPolitics : राज्यसभेसाठी शरद पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक; 'या' उमेदवाराचा प्रस्ताव मांडला

Politics : राज्यसभेसाठी शरद पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक; ‘या’ उमेदवाराचा प्रस्ताव मांडला

Subscribe

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आजच भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून येत्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपा अशोक चव्हाण यांना एका जागेवर उमेदवारी देऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या विरोधात एक चांगला चेहरा देण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावासाठी आग्रही आहे. एकूणच ते राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज यांच्या माध्यमातून मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आहेत. (Politics Sharad Pawar preparing to play masterstroke for Rajya Sabha Proposed the name of Chhatrapati Shahu Maharaj)

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही

- Advertisement -

देशभरातील 15 राज्यातील 56 जागांसाठी याच महिन्यात 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. यापैकी एका जागेवर काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती. परंतु, आता अशोक चव्हाण भाजपासोबत गेल्यामुळे शरद पवार यांनी राज्यसभेसाठी मविआकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विशेष म्हणजे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या नावासाठी आग्रह धरला आहे.

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

- Advertisement -

अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली असली तरी सध्या काँग्रेसमध्ये सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे ते राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. यासाठीच त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. यासंदर्भात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय होणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -