Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशPolitics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे..., अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल

Politics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे…, अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल

Subscribe

अमेरिकेत सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि इतर सात जणांनी भारतीय अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असे हे आरोप आहेत. त्यासंदर्भात अदानी यांच्याविरोधात वॉरंटदेखील काढण्यात आल्याचे सांगितले जात असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(Politics) मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर थेट अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत आणि भाजपाच्या प्रवक्त्यांनी त्यासंदर्भात खुलासा केला आहे. अदानी समूहाने काही खुलासा करणे एकवेळ समजून घेता येईल, परंतु भाजपाने यात घेतलेली उडी म्हणजे अदानी-भाजपा ‘हितसंबंधां’चा उघडउघड ‘वकालतनामा’च आहे, असा थेट हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group attacked BJP in Adani’s alleged bribery case)

थेट अमेरिकी न्याय विभागानेच हे आरोप केले असल्याने अदानी समूह, मोदी सरकार आणि अदानी यांचे उठताबसता ‘वकीलपत्र’ घेणारा भाजपा यांच्यात खळबळ माजणे स्वाभाविक आहे. अर्थात, हे आरोप झाले आहेत अमेरिकेतील न्यायालयात आणि ते केले आहेत तेथील न्याय विभागाने. त्यामुळे भाजपावाल्यांनी त्यांच्या प्रिय अदानींसाठी भारतात केलेली फडफड आणि तडफड वायाच जाईल, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : 2019 च्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरातील मतदानात वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परममित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप होणे हा काही नवीन विषय नाही. मोदी सरकारने धारावीपासून एअरपोर्टपर्यंत, खाणींपासून मोठ्या पायाभूत प्रकल्पांपर्यंत सगळेच अदानींना विकले आहे. परदेशांमधील कंत्राटेदेखील अदानी यांनाच मिळावीत यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतात असेही आरोप झालेच आहेत, असे सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुनावले आहे.

- Advertisement -

आता अदानी यांच्यावर थेट अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाले आहेत. पुन्हा तेथील विरोधी पक्षांनी वगैरे ते केलेले नाहीत तर, अमेरिकेतील सरकारी वकिलांनी केले आहेत आणि तेदेखील तेथील न्यायालयात. अमेरिकी न्याय विभागाच्या ‘यूएस ऍटर्नी ऑफिस’अंतर्गत येणाऱ्या ईस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क कार्यालयाने हे आरोपपत्र सादर केले आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेत सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि इतर सात जणांनी भारतीय अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असे हे आरोप आहेत. त्यासंदर्भात अदानी यांच्याविरोधात वॉरंटदेखील काढण्यात आल्याचे सांगितले जात असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Politics: Thackeray group attacked BJP in Adani’s alleged bribery case)

हेही वाचा – Gautam Adani : गौतम अदानींवर आंतरराष्ट्रीय संकट; केनियाने अदानींसोबतचा करार केला रद्द


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -